शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गाय, म्हशींसोबत मेंढ्यांचीही संख्या घटली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:17 IST

२१ वी पशुगणना : मुदत संपण्यापूर्वीच झाले १०० टक्के काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात झालेल्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. सदर माहिती राज्य व केंद्र शासनाला पाठविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पशुगणनेचे काम १०० टक्के पूर्ण झालेले आहे परंतु २० व्या पशुगणनेच्या तुलनेत जिल्ह्यातील गाय, म्हशीसोबत मेंढ्यांचीही संख्या बरीच घटलेली आहे.

शेती व्यवसाय करण्यासाठी अनेकजण जनावरे पाळतात. काहीजण दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी, तर मांस मिळवण्यासाठी शेळ्या-मेंढ्या मेंढ्यांपासून लोकरही मिळविली जाते. गत वर्षात शेतात यांत्रिकीकरणाचे प्रमाण भरपूर वाढले. याचा परिणाम गायी, बैल पाळणे बंद झाले. चारा तसेच गुराख्यांचीही समस्या निर्माण झाली. त्यामुळे अनेकजण पाळीव जनावरे विकू लागली. जिल्ह्यातील गायी, बैल, शेळ्या-मेंढ्या व म्हशींच्या संख्येत बरीच घट झालेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात जनावरांच्या तस्करीचेही प्रमाण वाढलेले आहे. १६४५ गावांत पशु गणनेचे काम करण्यात आले. याशिवाय २१० वॉर्डात हे काम झाले. जिल्ह्यात एकूण १ हजार ८५५ गावांमध्ये पशुगणना करण्यात आली.

२० व्या पशुगणनेतील स्थितीजिल्ह्यात २०१९ मध्ये २० वी पशुगणना झाली तेव्हा गाय वर्ग ४५ हजार ४७१, म्हैस वर्ग ६६ हजार २५९, मेंढ्या १८ हजार ६०५, शेळ्या २ लाख ३९ हजार ५८७, वराह २५ हजार २१० असे एकूण ८ लाख ९ हजार १३२ इतके पशुधन होते. कोंबड्या, बदके व इतर १० लाख १८ हजार ९६९ एवढी पाळीव पक्षी संख्या होती. यात मात्र वाढ झाली आहे.

काय आहे योजनेचा उद्देश?पशुगणननेमुळे जिल्ह्यातील पशुधनाची संख्या निर्धारीत होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल तसेच योजनांमध्ये सूसुत्रता आणण्यासाठी पशुगणना केली जात आहे. सदर मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.

"जिल्ह्यातील पशुगणना पूर्ण झालेली आहे. मुदत संपण्यापूर्वीच १० एप्रिलला पशुगणनेचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. शासनाला ही आकडेवारी पाठविण्यात आलेली आहे."- अजय ठवरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली