शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

10 तालुक्यात 27 ग्रामपंचायतींमध्ये वाजला सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 22:32 IST

मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी रविवारला सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी ३ पर्यंत होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या  कालावधीत  मुदत  संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या आदेशान्वये हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी रविवारला सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी ३ पर्यंत होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीकरिता आयोगाने सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील १२ पैकी १० तालुक्यांतील २७ ग्रामपंचायतीकरिता निवडणूक होणार आहे. त्यात सदस्य पदासह थेट सरपंचांची ही निवड मतदारांकडून केली जाणार आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रमतहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक : शुक्रवार, १८ नोव्हेंबर, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ दिनांक : २८ नोव्हेंबर २०२२ ते ०२ डिसेंबर २०२२, वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ५ डिसेंबर २०२२, वेळ सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)- दिनांक ७ डिसेंबर दुपारी ३ पर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ : दिनांक ७ डिसेंबर दुपारी ३ वाजता नंतर. ही सर्व प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक