शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिराेंचातील प्रसिद्ध ‘कलेक्टर’ गडचिराेलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

आंब्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील कलेक्टर हा आंबा आकाराने अतिशय माेठा आहे. हा आंबा अडीच किलाे वजनापर्यंत वाढताे. या आंब्याचे उत्पादन प्रामुख्याने सिराेंचा तालुक्यात घेतले जाते. मात्र, प्रयाेगशील शेतकरी असलेल्या राजेश इटनकर यांनी या प्रजातीच्या आंब्यांची लागवड स्वत:च्या फार्ममध्ये केली. सध्या आंबे एक किलाे वजनाचे झाले आहेत. पुढे हे आंबे अडीच किलाे वजनापर्यंत वाढणार आहेत. या आंब्यांची चव आता गडचिराेलीवासीयांनाही चाखता येणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : तेलंगणा व महाराष्ट्रात आपली विशेष ओळख निर्माण केलेला ‘कलेक्टर’ आता गडचिराेलीतही  पाेहाेचला आहे. सिराेंचात तर जिल्हाधिकारी नाही, मग ते गडचिराेलीत कसे येणार, असा प्रश्न पडला असेल. मात्र, कलेक्टर म्हणजेच जिल्हाधिकारी नसून ती एक आंब्याची प्रजात आहे. या प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांची लागवड गडचिराेली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या नागपूर मार्गावरील बागेत राजेश इटनकर यांनी केली आहे. आकाराने अतिशय माेठे असलेले हे आंबे लक्ष वेधून घेत   आहेत.आंब्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील कलेक्टर हा आंबा आकाराने अतिशय माेठा आहे. हा आंबा अडीच किलाे वजनापर्यंत वाढताे. या आंब्याचे उत्पादन प्रामुख्याने सिराेंचा तालुक्यात घेतले जाते. मात्र, प्रयाेगशील शेतकरी असलेल्या राजेश इटनकर यांनी या प्रजातीच्या आंब्यांची लागवड स्वत:च्या फार्ममध्ये केली. सध्या आंबे एक किलाे वजनाचे झाले आहेत. पुढे हे आंबे अडीच किलाे वजनापर्यंत वाढणार आहेत. या आंब्यांची चव आता गडचिराेलीवासीयांनाही चाखता येणार आहे. इटनकर यांनी फार्ममध्ये दशेरी, केशर, निलम, मल्लिका, आम्रपाली, ताेतापुरी, लंगडा या प्रजातींच्या आंब्यांची लागवड केली आहे. त्याचबराेबर जांभूळ, ॲप्पल बाेर, काजू, फणस व इतरही फळझाडांची लागवड केली आहे. जिल्ह्यातील वातावरण फळ पिकांसाठी याेग्य नाही, असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, इटनकर यांच्या फळबागेतील फळझाडांकडे लक्ष घातले तर हा समज चुकीचा असल्याचे दिसून येते. फळपिकांची याेग्य काळजी घेतल्यास फळशेतीतून चांगले उत्पादन मिळविता येणे शक्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी करावे प्रयाेगगडचिराेली जिल्ह्यातील जमीन व वातावरण फळबागेसाठी याेग्य आहे. मात्र, शेतकरी फळशेतीकडे वळेल यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ धान शेतीवर अवलंबून न राहता, फळशेतीकडे वळावे. माझ्या फळबागेला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतही हे प्रयाेग करण्यासाठी त्यांना याेग्य मार्गदर्शन करण्यास मी तयार असल्याचे राजेश इटनकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Mangoआंबा