शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली; चालक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 13:41 IST

वडसा-आरमोरी मार्गावरील घटना

गडचिरोली : विरुद्ध दिशेने येत असलेल्या स्कूटीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला खड्डयात उलटली. यात कार चालकाचा मृत्यू झाला. तर, कारमधील एकजण किरकोळ जखमी असून दुसरा थोडक्यात बचावला आहे. ही घटना आज (दि. १२) सकाळी आडेआठच्या सुमारास वडसा-आरमोरी मार्गावरील पाच पांडव देवस्थानाजवळ घडली.

पवन राऊत (२२, रा. मिरची वार्ड वडसा) असे मृत युवकाचे नाव असून भरत मेश्राम (रा. लोहारा) असे किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रशांत कावळे (रा. वडसा) हा सुखरूप बचावला आहे. पवन आणि प्रशांत हे दोघे ब्रह्मपुरी पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी आहेत. रविवारी काही कामानिमित्त भंडाराला जायचे असल्याने त्यांनी आरमोरी येथील एका मित्राची महिंद्रा झायलो कार मागिलती. मात्र परतताना उशीर झाल्याने कार आरमोरीला आणून न देता स्वतःजवळ ठेवली. आज सकाळी मित्राची कार परत करून देण्यात हे मित्र आरमोरीकडे निघाले. कार परत करून ते ब्रम्हपूरीला विद्यालयात जाणार होते परंतु वाटेतच काळाने घाला घातला.  

अपघातात कार चालक पवनच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या एका प्रवासीने अपघात झाल्याचे बघून जखमीला उलटलेल्या कारमधून बाहेर काढून आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पवनची प्राणज्योत मालवली. 

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली