शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलचळवळीचा रक्तरंजित इतिहास तीन भाषांमध्ये होणार शब्दबद्ध

By संजय तिपाले | Updated: July 26, 2023 13:15 IST

पत्रक काढून घोषणा: वरिष्ठ नेत्यांचे चरित्र, आगामी रणनितीचीही दिशा

संजय तिपाले

गडचिरोली: डाव्या विचारसरणीच्या कडव्या माओवादी संघटनांनी चालविलेल्या नक्षलचळवळीचा आतापर्यंचा रक्तरंजित प्रवास पुस्तकस्वरुपात जगासमोर येणार आहे. इंग्रजी, हिंदी व तेलगू अशा तीन भाषांमध्ये लवकरच चळवळीतील वरिष्ठ नेत्यांचे चरित्र प्रकाशित होणार आहे. यातून आगामी रणनितीही ठरण्याची शक्यता आहे. २६ जुलैला भारत कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याने पत्रक काढून याची घोषणा केली.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) २ सीपीआय (माओवादी) च्या शहीद केंद्रीय समिती सदस्यांच्या चरित्रांचे संकलन केंद्रीय समितीद्वारे इंग्रजी, हिंदी आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. संघटनेचा संस्थापक कॉम्रेड सीएम आणि कॉम्रेड के.सी. याने पुकारलेल्या दीर्घकालीन जनयुद्धाचा प्रवास येणाऱ्या पिढ्यांना कळावा, यासाठी १९६७ पासून आतापर्यंतची वाटचाल पुस्तकस्वरुपात येणार आहे. दरम्यान, नक्षली चळवळीत देशभरात १४ हजार ८०० हून अधिक कॉम्रेड्सनी आपले  प्राण दिले, त्यात ११६९ महिला कॉम्रेडचा समावेश आहे. कॉम्रेड चारू मजुमदार आणि कॉम्रेड कन्हाई चॅटर्जीसह ४१ आघाडीचे कॉम्रेड यांचे यात योगदान आहे. या सर्वांचे संक्षिप्त जीवनचरित्र प्रकाशित केले जाणार आहे. गेल्या १८ वर्षांपासून जागतिक समाजवादी क्रांतीसाठी अंतर्गत भारतात नवीन लोकशाही क्रांती यशस्वी करण्याच्या उद्देशाने ४ हजार ६८६ कॉम्रेड शहीद झाले. यामध्ये ८५६ महिला कॉम्रेडचा समावेश आहे. यानिमित्ताने आदरांजली अर्पण करून, शोषण-दडपशाही आणि साम्यवादापासून मुक्त समाजाची स्थापना करण्याची शपथ घेतली जाणार आहे.

नक्षलसप्ताहाच्या सुरुवातीलाच घोषणा

दरम्यान, २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान शहीद सप्ताह होत आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीलाच माओवाद्यांच्या केंद्रीय कमिटीने नक्षलचळवळीच्या रक्तरंजित थराराचा इतिहास उलगडणारे तीन भाषांतील पुस्तक प्रकाशित करण्याची घोषणा केल्याने गुप्तचर यंत्रणेसह पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. या पुस्तकाची उत्सुकता आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली