शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३७ बटालियनने देशाबराेबरच जिल्ह्याचीही सेवा केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

सीआरपीएफ ३७ बटालियनची स्थापना ५४ वर्षांपूर्वी १ जुलै १९६८ रोजी देवळी (राजस्थान) येथे झाली.  यानंतर, या बटालियनने राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहार, मणिपूर, आसाम, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा आणि महाराष्ट्र अशा देशाच्या विविध भागात तैनातीदरम्यान आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी येथील प्राणहिता पाेलीस मुख्यालयात तैनात असलेल्या सीआरपीएफ ३७ बटालियनचा ५४ वा स्थापना दिवस कमांडंट एम.  एच.  खोब्रागडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.  यावेळी कमांडंट यांनी जवानांना या बटालियनच्या इतिहासाची माहिती दिली.  सीआरपीएफ ३७ बटालियनची स्थापना ५४ वर्षांपूर्वी १ जुलै १९६८ रोजी देवळी (राजस्थान) येथे झाली.  यानंतर, या बटालियनने राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहार, मणिपूर, आसाम, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा आणि महाराष्ट्र अशा देशाच्या विविध भागात तैनातीदरम्यान आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडले. ६ जानेवारी २०१२ पासून बटालियन महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत आहे. ३७ बटालियनने अनेक आव्हाने पेलली आहेत. ही आव्हाने अजूनही संपलेली नाहीत.  पुढे नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी बळाची शिकवण, स्वयंशिस्त, संयम आणि समर्पणाची भावना सर्वोच्च ठेवावी लागेल, असे मार्गदर्शन केले. यावेळी ३७ बटालियनचे कमांडंट एम. एच.  खोब्रागडे, ९ बटालियनचे कमांडंट आर.  एस. बालापूरकर,१९२ बटालियनचे कमांडंट  देवराज, द्वितीय कमांडिंग ऑफिसर मनमदन किशनन, रामरस मीना आणि बिमल राज, डेप्युटी कमांडंट रमेश सिंग, सहायक  कमांडंट  तरुण डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. संपत कुमार, अरविंद सातोरे, सुभेदार मेजर फुलचंद, अधिनस्त अधिकारी व जवान व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहीद वीरांना श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने हुतात्मा स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कमांडंट ३७ बटालियनच्या क्वार्टर गार्डवर मानवंदना देण्यात आली. सैनिकी परिषद व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

टॅग्स :Policeपोलिस