शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्री बंदीसाठी तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:41 IST

बंद असलेली गावातील दारूविक्री पुन्हा सुरू झाल्यामुळे मांगदा गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावातील दारूविक्री तत्काळ बंद करा अशा सूचना महिलांनी रॅलीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना दिल्या. एकेकाळी दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मांगदा गावात जानेवारी महिन्यात मुक्तिपथच्या पुढाकाराने महिलांचे संघटन उभे करण्यात आले.

ठळक मुद्देमांगदा येथे रॅलीतून इशारा : मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : बंद असलेली गावातील दारूविक्री पुन्हा सुरू झाल्यामुळे मांगदा गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावातील दारूविक्री तत्काळ बंद करा अशा सूचना महिलांनी रॅलीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना दिल्या.एकेकाळी दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मांगदा गावात जानेवारी महिन्यात मुक्तिपथच्या पुढाकाराने महिलांचे संघटन उभे करण्यात आले. गावातील दारूविक्री पूर्णत: बंद होण्यासाठी महिला समोर आल्या. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव झाला. सातत्याने अहिंसक कृती करून दारूचे साठे महिलांनी नष्ट केले. परिणामी गावातील दारूविक्री पूर्णत: थांबली. पण गत काही दिवसात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले. लपून छपून विक्री सुरू केली. याच दरम्यान गावात काही हिंसक घटनाही घडल्या. महिलांनी मुक्तिपथ तालुका चमूला याची माहिती दिली. गावातील दारूविक्री थांबविण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यानुसार नियोजन करून दारूविक्रेत्यांना समज देण्यासाठी शनिवारी महिलांनी जनजागृती रॅली काढली. ‘बंद करा बंद करा, दारूविक्री बंद करा, नही चलेगी नही चलेगी, दारूविक्री नही चलेगी’ अशा घोषणा महिलांनी दिल्या. महिलांच्या या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणले.पुनर्वसित चव्हेला गावलाही दिल्या सूचनातुलतुली धरणात गेलेल्या चव्हेला गावाचे मांगदा गावाजवळ पुनर्वसन करण्यात आले आहे. चव्हेला हे गावही दारूविक्रीमुळे आधीच अनेक गावासाठी डोकेदुखी ठरले होते. पुनर्वसित झालेल्या लोकांनी नवीन जागेवरही दारूविक्री सुरू केली. परिणामी आसपासच्या गावांतील दारूबंदी प्रभावित होत आहे. त्यामुळे येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी चव्हेला येथील महिलांनी पुनर्वसित गावात जाऊन येथील विक्रेत्यांनाही समज देत दारूविक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या. यातून महिलांनी एकजुटता दाखविली.

टॅग्स :Socialसामाजिक