शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गडचिरोलीत होणार टेनिस कोर्ट

By admin | Updated: December 11, 2014 23:06 IST

राज्याच्या क्रीडा संचालनालयाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त मैदाने असणे गरजेचे आहे. मोठ्या शहरात आढळून येणारे सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टच्या

गडचिरोली : राज्याच्या क्रीडा संचालनालयाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त मैदाने असणे गरजेचे आहे. मोठ्या शहरात आढळून येणारे सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टच्या कामाला जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे येथील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळेत २३ लाख रूपयाच्या निधीतून प्रशस्त सिंथेटीक लॉन टेनिस कोर्ट होणार आहे. टेनिसपटू सानिया मिर्झा यांचे नाव पुढे येताच जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंना टेनिस खेळाची आठवण होते. गडचिरोली जिल्ह्यात टेनिस खेळणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, गडचिरोलीत आजवर सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टची निर्मिती करण्यात आली नाही. आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामॉर्फत आदिवासी नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याण कारी योजना राबविण्यात येतात. गडचिरोली प्रकल्प कार्यालयाकडे आदिवासी उपयोजनेंतर्गत सद्य:स्थिती २४ लाखाचा निधी उपलब्ध आहे. या निधीतून गडचिरोली येथे सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टचा प्रस्ताव प्रकल्प कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मान्यता दिली आहे. गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्यावतीने या सिंथेटीक लॉन टेनिस कोर्ट निर्मितीकरीता क्रीडा संचालनालयाच्या मार्गदर्शनात कंपनीकडून दरपत्रक मागविण्यात आले आहे. सदर टेनिस कोर्टचे काम सुरू होण्यासाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहे. या टेनिस कोर्टचे काम प्रत्यक्षात २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असल्याचे चिन्ह आहेत. कोर्टमध्ये आदिवासी व इतर विद्यार्थी खेळाडूंना टेनिसचा सराव करता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)