शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दागिण्यांसाठी भाडेकरूने केला महिला अधिकाऱ्याचा खून

By दिगांबर जवादे | Updated: April 18, 2025 16:35 IST

पुणे येथून घेतले ताब्यात : नवेगाव येथील प्रकरण

दिगांबर जवादेगडचिराेली : नवेगाव येथील सेवानिवृत्त अधिकारी कल्पना उंदीरवाडे यांचा १३ एप्रिल राेजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खून झाला. गडचिराेली पाेलिसांनी आराेपी विशाल ईश्वर वाळके (४५, रा. मुरखळा चक, ता. चामोर्शी) याला पुणे येथून माेठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. विशाल हा उंदीरवाडे यांच्या घरी भाड्याने राहत हाेता. उंदीरवाडे यांच्या अंगावर असलेले दागिने हिसकावण्यासाठी त्याने हाताेड्याने डाेक्यावर मारून उंदीरवाडे यांचा खून केला.

रविवारी सकाळपर्यंत सर्व व्यवस्थित असताना दुपारच्या सुमारास कल्पना उंदीरवाडे यांचा घरी अचानक मृतदेह आढळून आला. त्यांच्या डाेक्यावर मार लागल्याच्या खुणा दिसून आल्या. काेणासाेबतही भांडण झालेले नसताना अचानक त्यांना काेणी मारले असावे, असा प्रश्न निर्माण झाला. उंदीरवाडे यांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर पाेलिसांनी चाैकशीला सुरुवात केली. उंदीरवाडे यांच्या वरच्या मजल्यावर तीन भाडेकरू व तळमजल्यावर विशाल वाळके राहत हाेता. खून हाेण्याच्या पूर्वीपर्यंत ताे घरी हाेता. मात्र, खून झाल्यानंतर ताे अचानक गायब झाला. ही बाब पाेलिसांना खटकली. त्याला फाेन केले असता त्याचा फाेन कधी बंद, तर कधी सुरू राहत हाेता. त्यामुळे पाेलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. तसेच ताे वेळाेवेळी शहर बदलत असल्याने त्याला ताब्यात घेण्यास अडचणी निर्माण हाेत हाेत्या. अखेर पुणे पाेलिसांच्या मदतीने गडचिराेली पाेलिसांनी आराेपी विशालला शिवाजीनगर (पुणे) येथून ताब्यात घेतले व गडचिराेलीला आणले.

यांनी केले काम फत्ते

पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगणजुडे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे एपीआय डुलत, एपीआय राहुल आव्हाड, गडचिरोली पाेलिस स्टेशनचे एपीआय विजय चव्हाण, पीएसआय दीपक चव्हाण, पीएसआय विशाखा म्हेत्रे व डीबी पथकातील पाेलिस कर्मचाऱ्यांनी आराेपीला ताब्यात घेण्यास परिश्रम घेतले.

दाेन वर्षांपासून राहत हाेता भाड्यानेआराेपी विशाल वाळके हा कल्पना उंदीरवाडे यांच्या घरी दाेन वर्षांपासून भाड्याने राहत हाेता. पत्नी माहेरी निघून गेली हाेती. त्यामुळे ताे आई व मुलासह राहत हाेता. घटनेच्या काही दिवसांपूर्वी त्याने मुलगा व आईला गावी नेऊन सोडले हाेते. दुसऱ्यांचे पैसे द्यायचे हाेते. कल्पना उंदीरवाडे यांच्याकडील दागिने विकून कर्ज फेडायचे असा बेत त्याने आखला हाेता.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी