शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना तेलंगणाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 11:53 IST

धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे.

ठळक मुद्देएकही खरेदी केंद्र नाही छोट्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या काही वर्षांपासून कापसाचा पेरा वाढत आहे. यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे.आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर धानाचा पेरा होतो. परंतू अलिकडच्या काही वर्षात धानाचा पेरा कमी होऊन कापसाची लागवडही केली जात आहे. तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या गडचिरोलीच्या सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी या तालुक्यात तेलगू शेतकऱ्यांच्या मदतीने कापूस लागवडीचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. पण धानाप्रमाणे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या जिनिंग फॅक्टरीकडूनही शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. परंतू शासकीय दराएवढा दर कोणीही देत नाही. त्यामुळे काही मोठे शेतकरी तेलंगणा राज्यात जाऊन तेथील खरेदी केंद्रावर किंवा जिनिंगला आपला कापूस विकतात. खासगी व्यापाऱ्यांपेक्षा तिथे जास्त दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.वास्तविक १४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणाऱ्या कापसासाठी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाकडून चार तालुक्यात प्रत्येकी एक खरेदी केंद्र देणे आवश्यक होते. परंतू लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला नाही.एकही केंद्र नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाहतुकीचा भुर्दंड सहन करीत तेलंगणा गाठावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी