शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना मिळणार तांत्रिक अर्हतेत सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 10:08 IST

५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हतेत पूर्णपणे सूट तर ५० वर्षाखालील कर्मचाऱ्यांना समावेशनानंतर ३ वर्षेपर्यंत तांत्रिक अर्हता प्राप्त करण्याची सूट देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनगर परिषद-नगर पंचायतींमध्ये समावेशनाचा मार्ग मोकळा

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नवनिर्मित नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये मंजूर आकृतीबंधातील राज्यस्तरीय संवर्गातील पदे वगळता उर्वरित पदांवर जुन्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात तांत्रिक अर्हतेची अडचण येत आहेत. ती दूर करण्यासाठी ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हतेत पूर्णपणे सूट तर ५० वर्षाखालील कर्मचाऱ्यांना समावेशनानंतर ३ वर्षेपर्यंत तांत्रिक अर्हता प्राप्त करण्याची सूट देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्यात तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक तालुका मुख्यालयांचे नगर पंचायतीत रुपांतर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. याबाबतच्या प्रथम उद्घोषणेपूर्वी रितसर प्रक्रियेने ग्रामपंचायतमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नगर पंचायतीत समायोजित करायचे होते. परंतु तांत्रिक अर्हतेमुळे (एमएस-सीआयटी, टंकलेखन) त्यांचे समावेशन होऊ शकले नाही. याबाबत कर्मचारी संघटनांची निवेदने आणि विभागीय स्तरावरून प्राप्त अहवालानुसार तांत्रिक अर्हतेत सूट देण्याचा निर्णय ३० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला.त्यानुसार ५० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हतेतून सूट तर ५० पेक्षा कमी वय असणाऱ्यांना समावेशनानंतर ३ वर्षाच्या आत तांत्रिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ते सादर न केल्यास त्यांचे समावेशन रद्द होणार आहे.

चार आठवड्यात समावेशन कराशासन निर्णय १९ जानेवारी २०१७ नुसार विहीत अर्हता पूर्ण करणाऱ्या तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधातील मंजूर पदांवर समावेश करण्याची कार्यवाही विभाग स्तरावर गठित केलेल्या समितीने पूर्ण करणे अपेक्षित होते. पण ती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास येत्या ४ आठवड्यात म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असेही शासन आदेशात नमूद केले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने समावेशनासाठी शिफारस केलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मुख्याधिकाºयांनी २ आठवड्याच्या आत नियुक्ती आदेश द्यावा, असे नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी सूचित केले आहे.अर्हता धारण करणारा कर्मचारी ज्या पदावर कार्यरत आहे त्या प्रकारचे पद समावेशनासाठी उपलब्ध नसल्यास अन्य ज्येष्ठ अथवा कनिष्ठ स्तरावरील पदावर समावेशन करता येणार आहे. मात्र भविष्यात कोणत्याही पदावर नियुक्तीसाठी मागणी करणार नाही, अशा आशयाचे हमीपत्र कर्मचाºयाने विभागीय आयुक्तांकडे सादर करायचे आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानGovernmentसरकार