शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

चिक्की तपासण्यासाठी अन्न व औषध विभागाचे पथक अहेरीत दाखल

By admin | Updated: July 15, 2015 01:38 IST

तालुक्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या चिक्कीच्या पुड्यावर घटक पदार्थ शेंगदाना असे लिहिले असून त्यामध्ये मात्र राजगिराची चिक्की आढळली.

दणका लोकमतचाअंगणवाड्यांची तपासणी : शासनाला अहवाल पाठविणारअहेरी : तालुक्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या चिक्कीच्या पुड्यावर घटक पदार्थ शेंगदाना असे लिहिले असून त्यामध्ये मात्र राजगिराची चिक्की आढळली. त्याचबरोबर सदर पॉकेटवर पॅकींगची तारीख नसल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये सोमवारी प्रकाशित होताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक मंगळवारी अहेरीत दाखल झाले व त्यांनी अंगणवाड्यांमधील चिक्कीची तपासणी केली. सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने अंगणवाडीतील बालकांना खाद्य पदार्थ म्हणून शेंगदाना व राजगिराची चिक्की पुरविण्याचा निर्णय घेतला. अहेरी येथील अंगणवाड्यांना सुर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित वेंगुर्ला जि. सिंधूदुर्ग या उत्पादक कंपनीकडून मालाचा पुरवठा केला जात होता. मात्र बहुतांश पुड्यांवर घटक पदार्थ म्हणून शेंगदाना असे लिहिण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र पुड्याच्या आतमध्ये राजगिरा असल्याचे दिसून आले. तसेच सदर पुड्यावर पॅकींग केल्याचा दिनांक, बॅच क्रमांक, वजन याबद्दलचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे काही पालकांमध्ये या चिक्कीबद्दल संशय निर्माण होऊन त्यांनी याबाबत लोकमतच्या प्रतिनिधीकडे तक्रार केली. याबाबतचे वृत्त सोमवारी लोकमतच्या प्रादेशिक पानावर प्रसिध्द झाले. सदर वृत्त वाचल्यानंतर बालकल्याण तसेच अन्न व पुरवठा विभाग खळबळून जागा झाला. आयुक्तांनी चौकशीचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले. गडचिरोली येथील अन्न सुरक्षा अधिकारी चहांदे यांच्यासह दोन अधिकारी मंगळवारी अहेरी येथे दाखल झाले. त्यांनी जिल्हा परिषद शाळेजवळ असलेली अंगणवाडी, धरमपूर येथील अंगणवाडी तसेच इतर अंगणवाड्यांचीही तपासणी केली. मात्र अंगणवाडी सेविकांनी सदर पॉकेट बालकांना वितरित केले असल्याने त्याचे नमुने आढळून आले नाही. त्याचबरोबर अहेरी बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. डी. मेश्राम या जिमलगट्टा येथे गेल्या असल्याने त्यांचीही भेट होऊ शकली नाही. याबाबतची माहिती मेश्राम यांनी अन्न व औषध विभागाला गडचिरोली येथे येऊन द्यावी, अशी सूचना करून पथकातील अधिकारी गडचिरोली येथे परतले. (शहर प्रतिनिधी)