शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना मिळणार तंत्रज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:57 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शैक्षणिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ठळक मुद्देडीआयईसीपीडीचा उपक्रम : विद्यार्थी, पालक, केंद्रप्रमुखांनाही होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शैक्षणिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाविषयीची रूची वाढून त्यांचे लक्ष केंद्रीत राहण्यास मदत होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शिक्षकांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन करताना करावा, असे निर्देश शिक्षण विभागाकडून दिले जात आहेत. विविध प्रकारचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. मात्र काही शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकाºयांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे समजत नाही. त्यामुळे साहित्य असूनही त्यांचा वापर होत नाही. यावर उपाय म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून मागणी करेल, त्या शिक्षक व अधिकाºयांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पर्यवेक्षीय यंत्रणेतील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विषय साधनव्यक्ती, विशेष तज्ज्ञ, फिरते शिक्षक, पालक, विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांना प्रशिक्षण मिळणार आहे.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसºया शनिवारी माहिती तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले जाईल. यासाठी डायटने स्वतंत्र लिंक तयार केली आहे. प्रशिक्षण घेऊ इच्छीणाºयाने या लिंकवर माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती भरताना प्रशिक्षणार्थ्याचे नाव, पद, शाळेचे नाव, तालुका, मोबाईल क्रमांक, ई-मेल, कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, याबाबत माहिती भरावयाची आहे. या नावीण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.विनीत मत्ते, संभाजी भोजने, डॉ.नरेश वैद्य, मिलींद अघोर, पुनित मातकर, वैशाली येगलोपवार, विषय सहायक कुणाल कोवे, डॉ.विजय रामटेके, विठ्ठल होंडे, नीलकंठ शेंडे, सुचरिता काळे, अश्फिया सिद्धीकी हजर होते.या बाबींचे दिले जाणार प्रशिक्षणशैक्षणिक अ‍ॅप डाऊनलोड करणे, त्यांचा वापर करणे, ई-मेलविषयीची माहिती, शैक्षणिक व्हिडीओ डाऊनलोड करणे, इंटरनेटवरून आवश्यक ती माहिती काढणे याचबरोबर शैक्षणिक तंत्रज्ञानाविषयीची जी माहिती प्रशिक्षणकर्ता विचारेल, त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.प्रशिक्षणाला येताना प्रशिक्षणार्थ्याने लॅपटॉप, अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल, चार्जर, डेटा इंटरनेट पॅक, एक्स्टेक्शन बॉक्स आदींपैकी प्रशिक्षणासाठी गरजेचे साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाला येणाºयांना डायटकडून प्रवास व दैनिक भत्ता दिला जाणार नाही. प्रशिक्षण मात्र नि:शुल्क राहील.

टॅग्स :Teacherशिक्षक