शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:34 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : शिक्षक समिती व शिक्षक परिषद संघटनांचा एल्गार

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. दोन्ही संघटनांच्या शिक्षकांनी निवेदन सादर केले.महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्तधारकाला सर्व लाभ देऊन आनंदी सेवा निवृत्ती दिन साजरा करावा, वरिष्ठ वेतन श्रेणी व प्रलंबित निवड श्रेणीचे प्रकरणे मंजूर करावी, स्वच्छतागृहांचा रखडलेला अंतिम हप्ता देण्यात यावा, अंशदायी पेन्शन योजनेच्या जमा रकमेचा ताळमेळ जोडविण्यात यावा, शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुखांची पदे प्राथमिक शिक्षक संवर्गातून पदोन्नती भरावी, एकस्तर पदोन्नतीची वेतनश्रेणी विकल्पानुसार सुरू ठेवावी, शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळाला जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, मनिषा दोनाडकर यांनी भेट दिली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, जीवन शिवणकर, योगेश ढोरे, अमरसिंह गेडाम, माया दिवटे, अशोक दहागावकर, गुलाब मने, डंबाजी पेंदाम, रवींद्र मुलकलवार, मनोज रोकडे, शिवाजी जाधव, नरेश चौधरी, शेषराव संगीडवार, संजय लोणारे, ओमप्रकाश गर्गम, गडपायले, सुनील चरडुके यांच्यासह शेकडो शिक्षक आंदोलनस्थळी हजर होते.शिक्षक परिषदेचा जिल्हा कचेरीसमोर ठिय्यायामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा या मुख्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांच्या मार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, संतोष सुरावार, कार्यवाह प्रमोद भांडेकर, गोपाल मुनघाटे, अविनाश तालापल्लीवार, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत शेंडे, सत्यवान मेश्राम, नत्थूजी पाटील, निलेश खोब्रागडे, देविदास गणवीर, सुरेंद्र धकाते, मोहन देवकते, दिगांबर देवकते, प्रशांत थोटावार, शिवदास वाढणकर, पुरूषोत्तम बोरीकर, जी. पी. उंदीरवाडे, निलेश विश्रोजवार, आर. आर. बनपूरकर, वेलादी, किरण तोटावार, डी. वाय. खेवले, रेमाजी चुधरी, जे.पी. उंदीरवाडे, आर. टी. वेलादी, आर. आर. बनपूरकर, टी. एस. बोरीकर, व्ही. एल. बुरमवार, एम. एन. विश्रोजवार, डी. के. वेलादी, आर. एस. झोडे, ईश्वरदास राऊत आदी उपस्थित होते.