शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची पाल्यांच्या घरी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:15 IST

तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व पाल्यांच्या घरी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपालकांची मनधरणी जोमात : नोकरी टिकविण्यासाठी उन्हातान्हात भटकंती सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व पाल्यांच्या घरी भटकंती करावी लागत आहे.आमची शाळा चांगली आहे, विविध सोयीसुविधा असून चांगला निकाल देण्याची तसेच गुणवत्तेची हमी असल्याचे सांगून आमच्याच शाळेत मुलांचा प्रवेश करा, प्रवेश फी मी भरतो, तुम्ही दाखल द्या, अशी मनधरणी ग्रामीण भागातील बहुतांश शिक्षक पालकांपुढे करीत आहेत.सन २०१९-२० हे शैक्षणिक सत्र २६ जून २०१९ रोजी सुरू होणार आहे. या शैक्षणिक सत्रासाठी आतापासूनच विद्यार्थ्याचे प्रवेश पूर्ण केले जात आहेत. गेल्या सात-आठ वर्षात तालुका मुख्यालयासह जिल्हा तसेच मोठ्या गावांमध्ये इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढली. परिणामी विद्यार्थी पटसंख्या मिळविण्यासह टिकविण्यासाठी संबंधित संस्था व शाळांमधील शिक्षकांची मोठी कसरत होत आहे.सध्या शालेय परीक्षांचा काळ सुरू आहे. सकाळच्या सत्रात शाळा सुरू असून परीक्षा घेतल्या जात आहेत. अशास्थितीत अनेक शाळांचे शिक्षक दुपारी ४ वाजतानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळा परिसरातील अनेक गावांमध्ये फिरून इयत्ता पहिली, पाचवी, आठवीतील प्रवेशित मुलांचे दाखले मिळवित आहेत. काही शाळांमधील अर्धे शिक्षक सकाळपाळीत तर काही शिक्षक दुपारपाळीत गावागात फिरून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याच्या कामात व्यस्त आहेत. यामध्ये नर्सरीपासून ते माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचा समावेश आहे. ग्रामीण भागात शिक्षकांच्या भेटी वाढल्या आहेत.निवडणुकीच्या ड्युटीमुळे यंदा लवकरच मोहीमगडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार असून या निवडणुकीच्या कामासाठी अनेक शाळांच्या शिक्षकांची ड्यूटी लावण्यात आली आहे. तसे पत्रही संबंधित शिक्षकांना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बहुतांश शिक्षक ७ ते ११ एप्रिल या कालावधीत निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. निवडणुकीच्या या कामामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांचे दाखले मिळविण्यासाठीचा हा हंगाम यंदा १५ दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. शाळांसाठीची प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित केल्यानंतर शिक्षक निवडणुकीच्या कामाकडे वळणार आहेत. पाल्यांच्या दाखल्यासाठी पालकांना विविध प्रकारचे आमिषही अनेक शिक्षक देत असल्याची माहिती आहे. एकूणच शिक्षकांची कसरत सुरू आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा