शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत शिक्षक भरती रखडली, शेकडो पदे अद्याप रिक्त!

By दिलीप दहेलकर | Updated: August 13, 2025 17:46 IST

प्रशासन झाले हतबल : भरती प्रक्रिया बंद, जिल्हा परिषद शाळांना नवे शिक्षक आणायचे कुठून?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तांत्रिक अडचणी व न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची पदभरती गेल्या दोन वर्षापासून रखडली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात आतापर्यंत दोन ते तीन टप्प्यांत कंत्राटी स्वरूपात मानधन तत्त्वावर शिक्षकांची शाळांवर ५५० जणांची नियुक्ती केली. मात्र, अजूनही ४५० शिक्षकांची कमतरता आहे.

शहरात ठाण मांडून बसलेल्या काही खास शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्याही रद्द केल्या. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रात नियमित शिक्षकांची बरीच पदे रिक्त आहेत. नॉन पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र, पेसा क्षेत्राच्या तुलनेत रिक्त जागांची संख्या कमी आहे.

पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरण्याचा निर्णय राज्य शासनाने सन २०२३ मध्ये घेतला होता. त्यानुसार आदिवासी लोकसंख्येच्या अहिल्यानगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ आदी जिल्हा परिषदांना शिक्षक भरतीसाठी हिरवा कंदिल मिळाला. मात्र, बिगर आदिवासी संघटनांनी भरती प्रक्रियेविरोधात याचिका दाखल केली. त्यामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. तेव्हापासून तिढा कायम आहे.

शैक्षणिक नुकसान नाहीरिक्त असलेल्या जागांवर यंदा तब्बल ५५० कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजूनही शेकडो शिक्षकांची आवश्यकता आहे. असे असले तरी शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे यांनी दिली.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीGadchiroliगडचिरोली