निवेदन : मागण्यांसंदर्भात चर्चाकुरखेडा : शिक्षकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा कुरखेडाच्या वतीने कुरखेडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रविण शिवनकर यांना २३ मार्च रोजी साकडे घालून मागण्यांचे निवेदन सादर दिले. फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात यावे, चटोपाध्याय वेतन श्रेणी लागू करावी, शिक्षकांचे नियमित, स्थायी व निवड श्रेणीचे प्रस्ताव त्वरित जिल्हा परिषदेस सादर करावे, अर्जित रजेची रक्कम त्वरित मंजूर करून त्यांचे वेतन निकाली काढावे, इतर पंचायत समितीमध्ये बदली झालेल्या शिक्षकांचे सेवापुस्तक लवकरात लवकर संबंधित पंचायत समितीला पाठवावे, परीक्षेला बसलेल्या शिक्षकांना शिक्षणासाठी कार्योत्तर मंजुरी द्यावी, जीपीएफचे प्रकरणे मंजूर झाल्यानंतर पंचायत समितीस्तरावर शिक्षकांना त्वरित धनादेश द्यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष खिरेंद्र बांबोळे, कार्याध्यक्ष प्रमोद संगमवार, मधुकर राघोर्ते, गुरूदेव कापगते, दिगांबर करंबे, मनोहर परशुरामकर, विलास बन्सोड, अनिल कापगते, विनोद उके, रवींद्र गावंडे, गिरीधर करवडे, जुमनाके, गुड्डेवार, दिघोरे, विलास बन्सोड यांच्यासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा कुरखेडाचे सदस्य उपस्थित होते. समस्या न सुटल्यास पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेडातील शिक्षकांचे बीईओला साकडे
By admin | Updated: March 26, 2016 01:11 IST