शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रणरागिनी! बिबट्याच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार करत ताराबाईने केली पतीची सुटका

By गेापाल लाजुरकर | Updated: December 30, 2024 20:18 IST

नागरवाही जंगलातील थरार : चारपैकी दाेघेजण गंभीर जखमी.

गाेपाल लाजूरकर, गडचिराेलीगडचिराेली : सरपण गाेळा करून बैलबंडीत भरत असतानाच झुडपातून अचानक बिबट्याने चार जणांवर एकापाठाेपाठ हल्ला चढविला. यात एक जाेडपे हाेते. आपल्या पतीवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसताच महिलेने बिबट्याच्या डाेक्यावर कुऱ्हाडीच्या मुंदे(मागील बाजू)ने वार करीत पतीची सुटका केली. हा थरार आरमाेरी तालुक्याच्या नागरवाही जंगलात साेमवार, ३० डिसेंबर राेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. बिबट्याच्या हल्ल्यात दाेघेजण गंभीर जखमी तर दाेघे किरकाेळ जखमी झाले.

गोवर्धन यादव कुमरे (६३), दीक्षांत तेजराव कुमरे (२२) हे दाेघे गंभीर जखमी झाले, तर ताराबाई कुमरे (५०), तेजराव मोडूजी कुमरे (५२) हे किरकाेळ जखमी झाले. हे चारही जण नागरवाही येथील रहिवासी आहेत. यात दाेघे पिता-पुत्राचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नागरवाही येथील कक्ष क्र. ३०८ मधील जंगलात ३० डिसेंबर राेजी सकाळी चारजण सरपण गाेळा करण्यासाठी गेले हाेते. सरपण गाेळा करून दुपारी १ वाजेच्या सुमारास बैलबंडीमध्ये भरत असतानाच झुडपातून बिबट्याने चारही जणांवर एकापाठाेपाठ प्राणघातक हल्ला केला. सर्वानी मिळून हिमतीने बिबट्याचा सामना केला. दरम्यान, बिबट्याने गाेवर्धन कुमरे यांच्यावर हल्ला केला असता त्यांची पत्नी ताराबाई यांनी मोठ्या हिमतीने बिबट्याच्या डाेक्यावर कुऱ्हाडीच्या मागील बाजूने वार केला. ह्या जबरदस्त वारामुळे व चारही जणांच्या ओरडण्यामुळे बिबट जंगलात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर व कर्मचाऱ्यांनी जखमींना सुरूवातीला देलनवाडी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारार्थ भरती केले. त्यानंतर आरमाेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. देलनवाडीच्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी जंगलात एकटे-दुकटे जाऊ नये. वन्यप्राण्यांपासून स्वत:ला जितके दूर ठेवता येईल तेवढे दूर राहावे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना शासन नियमानुसार भरपाई दिली जाईल.- संजय मेहेर, वनपरिक्षेत्र अधिकारी, देलनवाडी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीleopardबिबट्या