शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नळ पाणीपुरवठा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:52 IST

स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्व वॉर्डात नळ पाणीपुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीपात्रातील पाणी इंटेकवेलमध्ये खेचण्यासाठीच्या मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शनिवारी व रविवारी असे दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला.

ठळक मुद्देमोटार बिघडल्याने समस्या : महिलांची विहीर व हातपंपावर गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्व वॉर्डात नळ पाणीपुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीपात्रातील पाणी इंटेकवेलमध्ये खेचण्यासाठीच्या मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शनिवारी व रविवारी असे दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला. रविवारी नळपाणीपुरवठा काही वॉर्डात पूर्ववत सुरू झाला.स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाणीपुरवठा करण्यासाठी शहराच्या विविध ठिकाणी सात जलकुंभ निर्माण करण्यात आले. वैनगंगा नदी परिसरातील बोरमाळा घाटावर पालिकेच्या वतीने नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. नदीपात्रात इंटेकवेल व वरच्या भागात मोठी पाणीटाकी निर्माण करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी इंटेकवेलमधून मोटारच्या सहाय्याने वरच्या टाकीत टाकले जाते. वरच्या टाकीतून हे पाणी जलशुद्धी केंद्राच्या ढोल्यात आणले जाते. या जलशुद्धी केंद्रातून इंदिरा गांधी चौक, गोकूलनगर व इतर भागातील टाकींमध्ये पाणी सोडले जाते. त्यानंतर या टाकींमधून पाईपलाईनद्वारे नागरिकांना नळाचे पाणी पुरविले जाते.दरम्यान इंटेकवेलमध्ये पाणी खेचणाऱ्या मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला. पालिकेच्या वतीने दररोज सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेत नळ पाणी पुरवठा केला जातो. शनिवारी मोटारची दुरूस्ती न झाल्याने सायंकाळी शहरात नळ पाणीपुरवठा झाला नाही. तसेच रात्री टाकीमध्ये पाणी सोडता न आल्याने नळ पाणीपुरवठा रविवारी सकाळच्या सुमारास बंद होता. रविवारी दुपारी १२ पर्यंत मोटारची दुरूस्ती करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. रविवारी सायंकाळी शहराच्या काही भागात नळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्याची माहीती आहे.नगर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद होता. आता या मोटारची दुरूस्ती झाली असून रविवारी सायंकाळपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल.- प्रवीण वाघरे, पाणीपुरवठा सभापती, नगर परिषद, गडचिरोलीनळ पाणीपुरवठयाच्या कामात हयगय केली जात असल्याने आपण काही दिवसांपुर्वीच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चौधरी यांना नोटिस बजावली आहे. आता मुख्य पंपाच्या मोटारची दुरूस्ती करण्यात आली ेअसून रविवारी सायंकाळी पाणी पुरवठा सुरू झाला.- संजीव ओहोड, मुख्याधिकारी नगर परिषद, गडचिरोली

टॅग्स :Waterपाणी