शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवार सभेत शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: June 1, 2017 01:49 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, गडचिरोली, धानोरा या तीन तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने

योजनांची दिली माहिती : गडचिरोली, चामोर्शी, धानोरा तालुक्यात आमदारांची सभा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, गडचिरोली, धानोरा या तीन तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्त्वात ४० गावांत शिवार संवाद सभा यात्रा काढण्यात आली. या सभांमध्ये शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली व शेतकऱ्यांच्या अनेक समस्याही जाणून घेतल्या. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ४० हजार कोटीहून अधिक रूपयांची गुंतवणूक शेतीसाठी करण्यात आली आहे. आघाडी शासनाच्या काळापासून प्रलंबित असलेली कृषी पंप जोडणी विद्यमान सरकारने पूर्ण केली आहे. आघाडी शासनाच्या १५ वर्षाच्या काळात केवळ २३ हजार कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली तर विद्यमान सरकारच्या काळात अडीच वर्षात अडीच लाखाहून अधिक वीज जोडणी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा विमा व विविध योजना राबविल्या जात आहेत, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी शिवार सभेत मार्गदर्शन करताना दिली. शिवार संवाद यात्रेत जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, प्रभारी रमेश भुरसे, भाजपचे गडचिरोली तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, चामोर्शीचे दिलीप चलाख, धानोराचे शशिकांत साळवे तसेच संबंधित क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, स्थानिक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. व आपल्या समस्यांही मांडल्या. आ. डॉ. देवराव होळी यांनी हजारो शेतकऱ्यांशी यावेळी संवाद साधला. गडचिरोली तालुक्यातील मारोडा, सावेला, पोटेगाव, देवापूर, राजोली, गव्हाळहेटी, कोसमघाट, खरपुंडी, आंबेटोला, वाकडी, राखी, गुरवळा, गोविंदपूर, चामोर्शी तालुक्यातील गिलगाव, नवरगाव, कुथेगाव, वायगाव, थाटरी, येनापूर, मुधोली चक, जैैरामपूर, गणपूर, धर्मपूर, हळदीचक, धानोरा तालुक्यातील जांभळी, साखेरा, खुटगाव, कटेझरी, मेंढाटोला, चातगाव, निमनवाडा, रांगी आदी गावांमध्ये शिवार सभा आयोजित करण्यात आल्या. या सभांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.