एसडीओंना दिले निवेदन : विविध टप्प्यात आंदोलनएटापल्ली/आलापल्ली : ११ एप्रिलपासून राज्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी काळ्या फिती लावून काम करीत आहेत. या आंदोलनात विदर्भ पटवारी संघ नागपूर तालुका शाखा एटापल्लीचे तलाठीही सहभागी झाले आहेत. एटापल्ली तालुका तलाठी तालुका संघटनेचे अध्यक्ष संदीप जुनघरे, मंडल अधिकारी बी. एम. गुरू, व्ही. पी. बोधनवार यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाची माहिती दिली. आंदोलनाबाबतचा नोटीस उपविभागीय अधिकाऱ्यांना देतांना पोहणकर, तलाठी शेख, कन्नाके, एकनाथ टपाले, पराते, चालूरकर आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार एम. सी. रच्चावार यांनी सदर निवेदन स्वीकारले. या निवेदनात तलाठी साजाची पुनर्रचना करण्यात यावी, एनएलआरएमपीला सर्व सुविधांचा पुरवठा करावा, यासाठी येणारा इंटरनेटचा खर्च शासनाने करावा, लॅपटॉप, इंटरनेट, एडीटमोड पुरविण्यात यावे, गौण खनिजाच्या कामातून तलाठ्यांना वगळण्यात यावे, एनएलआरएमपीचे पायाभूत प्रशिक्षण सर्व तलाठ्यांना द्यावे.