शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या विचाराने मार्गक्रमण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:58 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला व समस्त बहुजन समाजाला प्रज्ञा, शील, करूणा व समानतेची शिकवण दिली. शांती व अहिंसेचाही मार्ग सांगितला. बहुजन समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण करणे आवश्यक आहे व तसा बहुजन समाजाने प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन डॉ.यशवंत दुर्गे यांनी केले.

ठळक मुद्देयशवंत दुर्गे यांचे आवाहन : कोरेगाव-भीमा शौर्य दिन महोत्सव; ध्वजारोहण व सलामी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला व समस्त बहुजन समाजाला प्रज्ञा, शील, करूणा व समानतेची शिकवण दिली. शांती व अहिंसेचाही मार्ग सांगितला. बहुजन समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण करणे आवश्यक आहे व तसा बहुजन समाजाने प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन डॉ.यशवंत दुर्गे यांनी केले.आॅल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने मंगळवारी कोरेगाव-भीमा शौर्यदिन महोत्सव गडचिरोलीनजीकच्या वैनगंगा नदीतिरावर घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे राष्टÑीय अध्यक्ष विनय बांबोळे तर स्वागताध्यक्ष म्हणून विदर्भ अध्यक्ष गोपाल रायपुरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेलंगणाचे मधु बावलकर, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम, विशेष अतिथी म्हणून अ‍ॅड.शांताराम उंदीरवाडे, राज्य कार्यवाह प्रितम साखरे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड.अर्चना कांबळे, अ‍ॅड.संतोष रामटेके, कोटगलचे सरपंच भारत खोब्रागडे, फेडरेशनच्या विदर्भ महासचिव सुनीता राऊत, विदर्भ निरीक्षक विलास साखरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष पंडित मेश्राम, एम्लाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत मेश्राम, यशवंत गोवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन फेडरेशनचे प्रवक्ते दिलीप गोवर्धन यांनी तर आभार जिल्हा सचिव अरूण शेंडे यांनी मानले. जिल्हा उपाध्यक्ष रूपेश सोनटक्के, अरूण शेंडे, जयपाल मेश्राम, देवदत्त बांबोळे, मिलींद भानारकर, मनोज खोब्रागडे, प्रतिमा करमे, संजय मेश्राम, विनोद जांभुळकर, प्रफुल्ल भैसारे, नेमाजी लाडे, जगदीश मेश्राम यांनी सहकार्य केले. महोत्सवाला गडचिरोली, तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील मिळून जवळपास दीड हजार बहुजन बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर