शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचाच्या एसडीपीओंवर शिस्तभंगाची कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:28 IST

महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

ठळक मुद्देकामबंद आंदोलनाचा इशारा : महसूल कर्मचारी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, डी. एम. दहिकर, एस. एस. बारसागडे, किशोर मडावी, झेमानंद मेश्राम, विकास कुमरे आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, १ नोव्हेंबर रोजी महसूल विभागाच्या वतीने रात्री १२ वाजतापासून कारवाई करीत तेलंगणा राज्यातून मेडीगड्डा प्रकल्पासाठी अवैध गोणखनिजाची वाहतूक करताना १० ट्रक जप्त करण्यात आले. त्यानंतर सदर ट्रक सिरोंचाच्या पोलीस ठाण्यात पहाटे ४ वाजता देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २ नोव्हेंबरला सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास सिरोंचाच्या तहसील कार्यालयात दोन अज्ञात व्यक्ती व पोलीस पथकासह आले. यावेळी सिरोंचाचे तहसीलदार शासकीय दौऱ्यावर होते. यावेळी तिथे गौणखनिज जप्त प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी उपस्थित असलेल्या तलाठी रवी मेश्राम व गजभिये यांना एसडीपीओंनी अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे संघटनेचे अध्यक्ष चंदू प्रधान यांनी सांगितले. याबाबतची लेखी तक्रार संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे केली. त्यामुळे आपण संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत आहोत, असे प्रधान यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर शिवीगाळ प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने १४ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला सिरोंचा येथील महसूल कर्मचारी काळ्या फिती आंदोलन करणार आहे, अशी माहिती प्रधान यांनी यावेळी दिली.प्रसंगी अभियोग दाखल करणारसिरोंचा येथे झालेल्या या सारख्या असंवैधानिक बाबी यापुढे घडू नये, कोणत्याही शासकीय कर्मचाºयांच्या भावनेला ठेच पोहाचू नये व प्रशासनातील कारभार सुरळीत पार पडावा, अशी आमची भूमिका असून महसूल कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अन्यथा अभियोग दाखल करणार, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Policeपोलिस