या तक्रारीत नमुद केल्यानुसार, शेतकरी बळवंत सुरजागडे यांच्या मालकीच्या शेतात महेश उत्तम वासेकर यांच्या नावाने वीटाभट्टीसाठी परवाना प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान आरएफओ राठोड व इतर कर्मचाऱ्यांनी दि.१५ मार्चला दुपारी सुरजागडे यांच्या शेतातील ४ हजार विटा दोन ट्रॅक्टरने अनधिकृतपणे नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी शेतमालक बळवंत सुरजागडे यांच्या भावाचा मृत्यू झाला. शेतापासून काही अंतरावर मृतक सुरजागडे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना आरएफओ राठोड यांनी आपल्या वनकर्मचाऱ्यांना आदेश देऊन विटभट्टी फोडली.
वास्तविक शेतमालकाकडे विटभट्टीबद्दल काही पुरावे नसल्यास कायदेशीर कारवाई करायला हवी होती. वनविभागाच्या जागेत विटभट्टी नसताना बेकायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आरएफओ यांना कुणी दिला, असा प्रश्न विटभट्टीधारक उत्तम वासेकर यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसातही करण्यात आली. याबद्दल एटापल्लीचे ठाणेदार शितलकुमार डोईजड यांना विचारले असता, तक्राराीची नोंद झाली असून चौकशी सुरु असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. या संदर्भांत आरएफओ राठोड यांना फोन केले असता त्यांनी फोन कॉलला स्वीकारलाच नाही. नायब तहसीलदार जे.जी. काडवाजीवार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी जांबियाचे सरपंच राजू नरोठे, विलास चिटमलवार, सचिन मोतकुरवार, अनिल करमरकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.