लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कोरोनाच्या संचारबंदीत अनेक मजुरांचा रोजगार हिरावला असल्याने सर्वसामान्य मजुरांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशा मजुरांच्या मदतीसाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.धानोरा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान आ.डॉ.होळी यांनी अनेक गावे व शहरातील बºयाच दुकानांना भेटी दिल्या. दरम्यान यावेळी त्यांनी सामाजिक डिस्टन्सिंगची पाहणी केली. याप्रसंगी धानोराच्या नगराध्यक्ष लीना साळवे, भाजपचे तालुकाध्यक्ष शशिक्षांत साळवे, साईनाथ साळवे, अनंत साळवे, नगरसेवक गजानन साळवे, भाजयुमोचे पदाधिकारी संजीव कुंडू, सारंग साळवे, गणेश भूपतवार आदी उपस्थित होते.कोरोना संसर्गापासून नागरिकांनी बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. कुठेही बाहेर न पडता घरातच राहावे. स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे डॉ.होळी यांनी सांगितले. धानोरा तालुक्यातील एकही मजूर तसेच गरीब व गरजू कुटुंबातील कोणताही सदस्य अन्नधान्य नसल्याच्या कारणावरून उपाशी राहू नये, भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा कुटुंबांना मदतीचा हात दिला पाहिजे, तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून या कुटुंबांना मोफत धान्य मिळवून दिले पाहिजे, असे डॉ. देवराव होळी यांनी यावेळी सांगितले.