जि. प. अध्यक्षांचे प्रतिपादन : आमगाव येथे स्वास्थ्य कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (म.) : आयुष्याची लढाई लढून त्यात विजय प्राप्त करण्यासाठी आरोग्याची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.आमगाव (म.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत किशोरी स्वास्थ कार्यक्रमाचे आयोजन करून किशोरवयीन मुला, मुलींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच भाविका देवतळे, पं. स. सदस्य उषा सातपुते, माजी पं. स. उपसभापती केशव भांडेकर, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण वासेकर, विजय सातपुते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन हेमके, विसापूरचे उपसरपंच उदेसिंग धिरबंशी, सुभाष कोठारे, सोमनाथ पिपरे, डॉ. गणवीर, डॉ. वासनीक, तालुका समुपदेशक पुरूषोत्तम घ्यार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी ५६ पिअर एज्युकेटर्सना मान्यवरांच्या हस्ते गणवेशाचे वितरण करण्यात आले. पुढे बोलताना जि. प. अध्यक्ष म्हणाल्या, किशोरवयीन मुला, मुलींच्या वेगळ्या समस्या असतात. ते आपल्या समस्या इतरांना सांगू शकत नाही. त्यांच्यामध्ये अनेक समज, गैरसमज असतात. सध्या पावसाचे दिवस सुरू असून स्वत:चे आरोग्य समृद्ध ठेवण्यासाठी किशोरवीयन मुला, मुलींनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन कुरूड आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक गुणवंत शेंडे, प्रास्ताविक पुरूषोत्तम घ्यार तर आभार डॉ. गणवीर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पंकज लिंगायत, विद्या उईके, प्रणित काळे, तुषार ढेंगे, आरोग्य सहायक लाकडे, स्नेहा मेश्राम, धनंजय पेलने, अपर्णा बेपारी, पी. जी. फुलसे यांच्यासह आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
समृद्ध जीवनासाठी आरोग्याची काळजी घ्या
By admin | Updated: June 28, 2017 02:25 IST