शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आया-बाया कंबर कसून उठा गं, दारू विकेल त्याला धरून कुटा गं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:58 IST

मुस्का येथे दारू व खर्राबंदी अंमलबजावणीची सभा घेण्यात आली. तत्पूर्वी काढलेल्या रॅलीतील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनामुळे शरीर व मन दुबळे होते.

ठळक मुद्देरॅलीत गरजल्या घोषणा : मुस्का येथे व्यसनमुक्ती सभा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : मुस्का येथे दारू व खर्राबंदी अंमलबजावणीची सभा घेण्यात आली. तत्पूर्वी काढलेल्या रॅलीतील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनामुळे शरीर व मन दुबळे होते. व्यसनमुक्तीची सुरूवात स्वत:पासून करण्यासाठी सर्वप्रथम स्वत:चे कार्यालय तंबाखुमुक्त केले. आता तालुक्याच्या तंबाखुमुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी यावेळी सांगितले.या सभेला ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक जाधव यांनी मार्गदर्शन करताना महिला कार्यकर्त्यांना धमकी व शिविगाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुरूमगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम यांनी तंबाखु व दारूचे आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य सेवक कलुरी यांनी केले. यावेळी रॅली काढण्यात आली. ‘आया बायांनो कंबर कसून उठा गं, जो दारू विकेल त्याला धरून कुटा गं’ अशा घोषणा देत गावातून रॅली काढली. या रॅलीत महाराष्ट्र विद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुस्काचे विद्यार्थी सहभागी झाले होते. दारू तसेच खर्रा विक्रेत्यांच्या घरी जाऊन महिलांनी खर्रा व दारू बंद करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मुक्तीपथ संघटनेचे संघटक सागर गोतपाघर यांनी खर्रा व दारूबंदी कागदावर न राहता प्रत्यक्षात आणण्यासाठी महिलांनी सतत कृतीशील राहण्याचे आवाहन केले. प्रेरक भास्कर कड्यामी यांनी व्यसनमुक्ती गाण्यातून प्रबोधन केले. यावेळी पं.स. सदस्य विलास गावडे, रामदास बोरकर, रसिका मारगाये, निलीमा ठलाल, गीता चोपडे, सावित्रा बोंगा, प्रकाश देसाई आदी उपस्थित होते. सभेला गावातील शेकडो महिला, युवक व पुरूष उपस्थित होते.

टॅग्स :liquor banदारूबंदी