शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:15 IST

तळेगाव, मोहगाव व साधुटोला येथील दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा. या मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील तळेगाव व वाकडी गावातील अनेक महिला शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या.

ठळक मुद्देनिवेदन सादर : तळेगाव व वाकडीतील महिला पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तळेगाव, मोहगाव व साधुटोला येथील दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा. या मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील तळेगाव व वाकडी गावातील अनेक महिला शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या महिलांच्या तक्रारी ऐकल्या व निवेदन स्वीकारले. दारू बंद करण्यासाठी आपला पाठींबा असल्याचे सांगून दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. गावातील संघटनेला दारू बंद करण्यासाठी इतर काय प्रयत्न करता येतील याविषयीही त्यांनी महिलांशी चर्चा केली.स्थानिक पोलिसांचे फारसे सहकार्य मिळत नाही. दारू विक्रेत्यांना लगेच सोडले जाते, दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जात नाही. त्यामुळे दारू विक्रेते मुजोर होत आहेत, अशा तक्रारी घेऊन महिला पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यायला आल्या होत्या. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यायला आलेल्या महिलांपैकी कोणाचा नवरा दररोज घरातले तेल तांदूळ विकून दारू पितो, तर कुणाचा मुलगा दारू पिऊन शिवीगाळ करतो, एखादा नवरा दारू पिऊन आपल्या पोटच्या मुलींना मारण्याची धमकी देतो, तर कोणाचा भाऊ दारू पिऊन घरी त्रास देतो, अशा एक ना अनेक कहाण्या या महिलांपैकी प्रत्येकीच्या होत्या. यावरच उपाय म्हणून गावाची दारू बंद करण्यासाठी या महिलांनी गावात दारू विक्री बंदी केली, पण आसपासच्या गावात मात्र मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरूच आहे. यावर कारवाई होत नसल्याने दारूमुळे होणारे त्रास काही कमी होत नाहीत, असे महिलांनी एसपींना सांगत होत्या.यावेळी तळेगाव व वाकडी येथील अरुणा काशिनाथ गोनाडे, वनिता सहारे, वंदना काशिनाथ गोनाडे, वैशाली नैताम व दारूमुक्ती समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :liquor banदारूबंदी