शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
4
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
5
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
6
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
7
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
8
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
9
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
10
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
11
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
12
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
13
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
14
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
15
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
16
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
17
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
18
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
19
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
20
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या

मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 8, 2015 02:02 IST

धानोरा तालुक्यातील मिचगाव (खुर्द) येथील श्रीराम फटींग, बंटी फटींग, गोलू फटींग, किरण फटींग, मंगला फटींग ...

कडुकर कुटुंबीयांची मागणी : तक्रार घेण्यास पोलिसांचा नकारगडचिरोली : धानोरा तालुक्यातील मिचगाव (खुर्द) येथील श्रीराम फटींग, बंटी फटींग, गोलू फटींग, किरण फटींग, मंगला फटींग व अनंता फटींग या सहा जणांनी वाद घालून विलास पांडुरंग कडुकर, पंकज विलास कडुकर, गणेश विलास कडुकर व पल्लवी भाऊराव कडुकर या चौघांना बेदम मारहाण केली. हे चारहीजण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेसंदर्भात तक्रार देण्यासाठी गेलो असता, गडचिरोली व चातगाव पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडुकर कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या फटींग कुटुंबीयातील सहा जणांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रेमलाल पांडुरंग कडुकर व सुधाकर पांडुरंग कडुकर यांनी मंगळवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.यावेळी माहिती देताना प्रेमलाल कडुकर म्हणाले, विलास कडुकर व श्रीराम फटींग यांचे घर शेजारी आहे. दोन्ही घराच्या मदात रस्ता आहे. श्रीराम फटींग हे आपल्या शेळ्या कडुकर यांच्या घरालगत असलेल्या संरक्षण कुंपालगत रिकाम्या जागेत नेहमी बांधत असतात. घटनेच्या दिवशी ५ जुलैला रविवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास शेळी हाकलल्याच्या कारणावरून फटींग कुटुंबीयांनी कडुकर कुटुंबीयांशी वाद घातला. दरम्यान कडुकर कुटुंबीयातील चौघांना बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर कडुकर यांचे नातेवाईक आनंदराव कावळे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सर्व जखमींना गडचिरोलीच्या रुग्णालयात दाखल केले.रुग्णालय पोलीस चौकीतील एका पोलीस शिपायाने सर्व जखमींचे बयाण घेतले व त्याने गडचिरोली शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास आम्हाला सांगितले. त्यानुसार आम्ही चार ते पाच नातेवाईक मिळून रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलीस ठाण्यात गेलो. यावेळी तेथील पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी चातगाव पोलीस मदत केंद्रात तक्रार देण्यास सांगितले. मात्र चातगाव पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, असा आरोपही प्रेमलाल कडुकर यांनी केला. (स्थानिक प्रतिनिधी)