शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाला तहसीलदारांनी लावल्या वाटाण्याच्या अक्षता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:28 IST

जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव सरकारी यंत्रणेच्या नियमावलीत रखडल्याने त्याचा फटका खासगी बांधकामांनाही बसत आहे. परंतू राज्य शासनाने घरगुती बांधकामासाठी वाळू घेण्यास परवानगी देण्याचा शासन निर्णय जारी केला असताना त्याला बगल देत चामोर्शीच्या तहसीलदारांकडून स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय व घरकुलांचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्याला दंड आकारला.

ठळक मुद्देघरकुलासाठी रेती नाही : लाभार्थ्यांला १.१३ लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव सरकारी यंत्रणेच्या नियमावलीत रखडल्याने त्याचा फटका खासगी बांधकामांनाही बसत आहे. परंतू राज्य शासनाने घरगुती बांधकामासाठी वाळू घेण्यास परवानगी देण्याचा शासन निर्णय जारी केला असताना त्याला बगल देत चामोर्शीच्या तहसीलदारांकडून स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय व घरकुलांचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्याला दंड आकारला. या प्रकाराबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रेतीघाटांच्या लिलावाअभावी नागरिकांना आपली बांधकामे थांबविण्याची वेळ येऊ नये यासाठी राज्य शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्ये शासन आदेश निर्गमित केला. त्यात गावकºयांना स्वत:च्या वापरासाठी जिल्हाधिकाºयांनी राखीव ठेवलेल्या घाटांतून प्रचलित दरानुसार पाच ब्रासपर्यंत रेती काढण्याची परवानगी तहसीलदारांकडून घेण्याची तरतूद केली. परंतू चामोर्शी तालुक्यात घरकूल व शौचालय बांधकामासाठी रेतीची गरज असणाऱ्यांना तहसीलदार परवानगी न देता उलट त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.चामोर्शी तालुक्यात शौचालयांची व घरकुलांची कामे प्रलंबित असल्यामुळे ग्रामसेवकांवर मोठा दबाव आहे. या कामाकरिता लाभार्थ्यांना रेतीची आवश्यकता असल्याने ग्रामपंचायतींनी तहसीलदारांकडे परवानगी मागितली. परंतू अशी कुठलीही परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका प्रभारी तहसीलदारांनी घेत दंड आकारल्याचे काही तक्रारकर्त्यांनी सांगितले.तहसीलदार निरूत्तरसध्या मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे चामोर्शीचा प्रभार आहे. या प्रकाराबाबत त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॉल घेतलाच नाही.

टॅग्स :sandवाळू