शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

शेळीचा बळी अन् वाघीण अडकली; महिलेचा बळी घेणारी टी- १३ वाघीण जेरबंद

By गेापाल लाजुरकर | Updated: October 23, 2023 16:38 IST

३ दिवसात रेस्क्यू टीमने जंगलात पकडले

गडचिराेली : रामाळा शेतशिवारात मजूर महिलेचा बळी घेणाऱ्या टी-१३ या वाघिणीला वन विभागाच्या ताडाेबा येथील टीमने साेमवारी सकाळी ८ वाजता रवी नियत क्षेत्रात जेरबंद केले. तीन दिवसाच्या शाेधमाेहिमेनंतर रेस्क्यू टीमला यश मिळाले. आरमाेरी तालुक्याच्या रवी नियत क्षेत्रातील १२/१ मधील जंगल परिसरात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पशुैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व शूटर अजय मराठे यांच्या रेस्क्यू टीमने अचूक अंदाज घेत वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले.

रामाळा-वैरागड रस्त्यालगतच्या जंगल परिसरात गेल्या महिनाभरापासून वाघाचा वावर आहे. या परिसरात तीन वाघ वावरत हाेते. सध्या दाेन वाघ अजूनही या भागात वावरत आहेत. १९ ऑक्टोबरला रामाळा येथील एका शेत शिवारात धान कापणी करणाऱ्या ताराबाई एकनाथ धोडरे या महिला मजुराचा टी-१३ वाघिणीने बळी घेतला होता. या घटनेने शेतकरी तसेच परिसरातील नागरिक धास्तावले होते.

गडचिरोलीचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वडसा वनविभागाचे उपवसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक संदीप भारती, आरमोरीचे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्र सहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक अजय उरकुडे, आनंद साखरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे (वन्यजीव), शूटर अजय मराठे, आर.आर.टी.सदस्यांनी ही माेहीम राबविली.

शेळीचा बळी अन् वाघीण अडकलीलाेकांच्या मागणीनुसार ताडोबा व गडचिरोली येथून रेस्क्यू टीम बोलवण्यात आली. सदर टीम गेल्या तीन दिवसांपासून वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम राबवत हाेती. वाघाचा वावर असेलल्या परिसरात २५ ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचे लाेकेशन शाेधले जात हाेते. विशेष म्हणजे, रविवारी अरसोडा-रवी जंगल परिसरात एका शेळीला ठार केले होते. त्यामुळे ती पुन्हा येईल म्हणून तेथे ट्रॅप कॅमेरे लावले हाेते. तसेच बेटसुद्धा ठेवला हाेता.

वाघिणीची रवानगी गाेरेवाड्यालासोमवारी पहाटे ४ वाजेपासून वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यू टीमने पहारा देत सापळा रचला. सकाळी ८ वाजताच्या दरम्यान टी-१३ वाघीण येताच तिची ओळख पटवून शूट करून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वाघीण जेरबंद झाली. वाघिणीला वडसा वन विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. टी-१३ वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा येथे नेण्यात येणार आहे.