शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्राणहिताकाठी ‘स्वच्छतेची वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथे १२ वर्षांनंतर भरलेल्या पुष्कर मेळ्यात दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या पूजा-अर्चेनंतर नदीपात्र आणि काठावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा जमत आहे. हा कचरा सर्वत्र पसरत असल्याने त्यातून अस्वच्छता निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पुष्करचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय विभागांनी मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे यात जवळपासच्या शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.यात सिरोंचातील राजे धर्मराव महाविद्यालय, सी.व्ही. रमण महाविद्यालय, भगवंतराव कला महाविद्यालय, अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूल, तसेच सिरोंचा सेवा समिती यांनी नदी घाट स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेतला. तसेच यापूर्वी शासनाच्या महसूल, बांधकाम विभाग, कृषी विभाग व नगर पंचायत विभागाने स्वच्छता मोहीम राबविली होती. यामुळे जणू काही स्वच्छतेची वारीच प्राणहिताकाठी आल्याचे चित्र दिसत होते.या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती करणारा हा उपक्रम धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्यासाठी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी योग्य नियोजन करून स्वच्छतेसाठी विविध संस्था, शाळांना एकत्रित आणले.

 अन् नदीकाठावरील  पाणी झाले स्वच्छ नदीतील गढूळ पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन मोटार पंप लावून त्याठिकाणी भाविकांना स्वच्छ पाण्यात आंघोळ करता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. भाविकांना नदीपात्रात आंघोळ करण्यास अडचण येत असल्यास त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. परंतु नदीपात्रातील गर्दीमुळे बाहेर येणारे पाणीही गढूळ येत होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता घाटापासून थोडे दूरचे पाणी स्वतंत्र पंपाद्वारे आंघोळीसाठी उपलब्ध केले जात आहे.

 

टॅग्स :riverनदीtourismपर्यटन