शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शाश्वत शेती म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 1:04 AM

पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे,

ठळक मुद्देकृष्णा गजबे यांचे प्रतिपादन : नैनपुरात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) गडचिरोली जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १४ फेब्रुवारीला नैनपूर येथील भाग्यलक्ष्मी सेंद्रीय गटचे गजेंद्र ठाकरे यांच्या सेंद्रीय शेतात करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल उईके, प्रमुख मार्गदर्शक युगेश रणदिवे, तालुका कृषी अधिकारी राटोड, महेंद्र दोनाडकर, प्रगतशील शेतकरी बांबोलकर, भाजीपाले, ठाकरे, अण्णाजी तुपत, गोविंदराव नागपूरकर, हरडे उपस्थित होतेयावेळी भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटांनी तयार केलेल्या कमी खर्चातील गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन करून आमदार गजबे आपल्या भाषणात या गटाच्या कामाचे कौतुक केले. या गटांनी चालू केलेल्या सेंद्रीय प्रकल्पाला शेतकºयांनी भेट द्यावी व एकत्र येऊन शेती करावी, असे मार्गदर्शन केले. महेंद्र दोनाडकर यांनी जीवामृत वेस्ट डीकंपोजर गांडूळ खत यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.कार्यक्रमाचे संचालन योगेश बोरकर, प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी युगेश रणदिवे यांनी तर आभार कल्पना ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक परिवेक्षक व भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटाच्या सदस्यांनी सहकार्य केले.