शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

संशयाने चार मुलांना केले अनाथ ! दगडावर ठेचून पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; ८० वर्षीय आजोबांवर आली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:54 IST

Gadchiroli : तालुक्यातील दुर्गम भागातील रोपीनगट्टा येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडावर डोके ठेचून निघृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील दुर्गम भागातील रोपीनगट्टा येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडावर डोके ठेचून निघृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आई-वडिलांच्या या टोकाच्या पावलामुळे चार निरागस बालकांचे छत्र हरपले आहे.

कनिष्ठा राकेश कुजूर (३२), राकेश सुकना कुजूर (३७, दोघे रा. रोपीनगट्टा) असे मृत दाम्पत्याचे नावे आहे. पेंढरी पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेवरील शेवटच्या टोकावर असलेल्या रोपीनगट्टा गावात ५ जानेवारी रोजी राकेशच्या शेतातील धान मळणीचे काम आटोपले होते. मंगळवारी पती-पत्नी दोघेही शेतावर गेले होते. सोबत वडील आणि मुलगीही होती. दुपारी 'आम्ही घराकडे जातो' असे सांगून हे दाम्पत्य निघाले, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. ७ जानेवारी रोजी गावाजवळील गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. दगडावर डोके ठेचून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पती राकेश बेपत्ता असल्याने त्यानेच खून केल्याचा संशय बळावला होता.

८ जानेवारी रोजी राकेशचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळून आला. पत्नीची हत्या केल्यानंतर पश्चात्तापातून तसेच अटकेच्या भीतीने त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

समज दिली तरीही संशयाचे भूत कायम

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश हा दारूच्या नशेत पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे ऑगस्ट महिन्यात गावात बैठक बोलावून राकेशला समज देण्यात आली होती. काही दिवस तो शांत होता, मात्र संशयाचे भूत पुन्हा डोक्यात शिरल्याने एका हसत्या खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले.

चिमुकले आईवडिलांच्या प्रेमाला पारखी

या घटनेने चार भावंडे जन्मदात्यांच्या प्रेमाला पारखे झाले. मानवी (१२), मेहमा (९), अर्णव (७) आणि शालिनी (५) अशी या भावंडांची नावे आहेत. यातील तीन मुले देऊळगाव येथील आश्रमशाळेत शिकत आहेत. आता या चारही भावंडांची जबाबदारी त्यांचे ८० वर्षीय वृद्ध आजोबा सुकणा कुजूर यांच्यावर येऊन पडली आहे. कर्ता मुलगा आणि सून गेल्याने या वयोवृद्ध आजोबांनी आता नातवंडांचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न आहे.

"कौटुंबिक वादातून आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे."- गोपीचंद लोखंडे, प्रभारी पोलिस अधिकारी, पेंढरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Suspicion leaves four children orphaned; husband kills wife, self.

Web Summary : Gadchiroli: A husband, suspecting his wife's character, murdered her and committed suicide, orphaning their four children. The tragic incident leaves the 80-year-old grandfather to care for the children.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी