शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांकडून सलग दुस-या दिवशी हत्या, पोलीस खब-या असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:41 IST

धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील चवेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया रानवाही येथील जादो पांडू जांगी (५२) यांना अपहरण करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेत नेले.

धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील चवेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया रानवाही येथील जादो पांडू जांगी (५२) यांना अपहरण करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेत नेले. त्यानंतर मंगळवारी रात्री बेदम मारहाण करीत त्यांची हत्या केली. सोमवारीही नक्षल्यांनी एका ग्रामस्थाची हत्या केली होती. सलग दुसºया दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड दहशत पसरली आहे.धानोरा तालुका मुख्यालयापासून १५ किमीवरील रानवाही गावातील जादो जांगी रात्री ११च्या सुमारास घरी झोपलेले असताना २० पेक्षा अधिक सशस्त्र नक्षलवादी तिथे आले. त्यांनी जांगी यांना उचलून नेले.तीन किमीवरील कठाणी नदी पार करून नक्षलवादी छत्तीसगड सीमेत शिरले. तिथे जांगी यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर मृताच्या खिशात एक चिठ्ठी ठेऊन नक्षलवादी निघून गेले. जांगी कुटुंबीयांना जंगलात सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.जादो पोलिसांचे खबरे होते. त्यांच्यामुळेच पोलिसांनी फायरिंग केले. म्हणूनच त्यांची हत्या केल्याचे जादो यांच्या खिशातील चिठ्ठीत म्हटले आहे.स्मरणार्थ स्मारक उभारणीयेलचिल पोलीस मदत केंद्रातर्फेआदिवासी नागरिकांसाठी विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २००९ मध्ये नक्षल्यांनी हत्या केलेल्या कल्लेम येथील रैनु गुम्मा आत्राम यांच्या स्मरणार्थ गावातच स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची पूजा मृताची पत्नी व मुलांच्या हस्ते करण्यात आली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी