शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करा

By admin | Updated: May 27, 2015 01:42 IST

धानोरा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्यावर चौकशीअंती दोष सिद्ध झाला आहे.

गडचिरोली : धानोरा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्यावर चौकशीअंती दोष सिद्ध झाला आहे. मात्र त्यांच्यावर अजूनपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २५ मे रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन एप्रिल व मे २०१५ तत्काळ करण्यात यावे, वेतन दिरंगाईमुळे शिक्षकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. नाहक व्याजाचे भूर्दंड सहन करावे लागत आहे, वेतन तत्काळ अदा करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा ३० मे पासून आंदोलन केले जाईल, असा इशारा परिषदेने दिला आहे. जि. प. स्तरावर प्रलंबित भविष्य निर्वाह निधीचे प्रकरण तत्काळ निकाली काढून शिक्षकांना त्याचा लाभ देण्यात यावा, तसेच भामरागड पं. स. तील कार्यरत मृतक शिक्षक राजू बत्तुलवार यांचे सेवानिवृत्ती प्रकरण मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षिपणामुळे बत्तुलवार कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असेही शिक्षक परिषदेने या निवेदनात म्हटले आहे.आखाडे हे गटशिक्षणाधिकारी असताना त्यांनी नियमबाह्य बदल्या व समायोजन करून शिक्षकांचे वेतन काढले आहे. याची चौकशी करून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर त्यांनी बदली समायोजन झाले नाही, असे भासविण्याचा प्रयत्न केला. कार्यालयाची दिशाभूल केली. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच यावर्षीचे आपसी बदल्यांचे धोरणही स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)