शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याने स्वत:चा जीव देऊन वाचविले जवानांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:20 IST

आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला.नक्षलविरोधी अभियानादरम्यान जंगलात गस्तीवर असलेले पोलीस जवान मंगळवारी रात्री एका ठिकाणी आराम करीत होते. यावेळी त्यांच्यासोबत एक कुत्राही होता. आराम करीत असलेल्या जवानांच्या डोक्याजवळ एक घोनस हा विषारी साप आल्याचे दिसताच सोबतच्या कुत्र्याने त्याच्या दिशेने पायाने माती ढकलत त्याला जवानांच्या जवळ येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ही बाब जवानांच्या लक्षात येताच त्यांनी उठून पाहीले असता एक विषारी साप तिथे होता. जवान सावध झाल्याचे पाहताच कुत्र्याने सापावर झडप घातली. मात्र त्या झटापटीत सापाने कुत्र्याला चावा घेतला. सापाला मारून पोलीस जवान धानोराच्या दिशेने निघाले असता कुत्र्याला सापाने दंश केल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्या कुत्र्याला लागलीच लगतच्या गावात जाऊन गावठी इलाज करण्याचा प्रयत्न जवानांनी केला, मात्र त्यात यश आले नाही. विषाचा अंमल झाल्याने त्या कुत्र्याने प्राण सोडला. आपला प्राण देऊन जवानांना वाचविणाऱ्या त्या कुत्र्याला बुधवारी सकाळी समाधी देण्यात आली.

टॅग्स :dogकुत्राPoliceपोलिस