शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

निवासी शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: September 16, 2016 01:58 IST

शाळेत निवासी राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांची

इंदारामच्या बालिका विद्यालयातील प्रकार : शिक्षिकेशिवाय विद्यार्थिनी परतल्या खासगी आॅटोने अहेरी : शाळेत निवासी राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांची असते. बाहेर स्पर्धा अथवा कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांना ने-आण करण्याची जबाबदारी संबंधित शाळेची असते. परंतु अहेरी नजीकच्या इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींच्या क्रीडा स्पर्धा आलापल्ली येथे सुरू असतानाही विद्यार्थिनींना शिक्षिकेशिवाय आॅटोने परतावे लागण्याची वेळ गुरूवारी सकाळी आली. विद्यार्थिनी खासगी आॅटोने शिक्षिकेशिवाय परतल्या. त्यामुळे येथील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा आलापल्ली येथे सुरू आहेत. या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी विद्यार्थिनींची दररोज ने-आण केली जात आहे. परंतु ने-आण करताना त्यांच्यासमवेत शाळेतील शिक्षक अथवा शिक्षिका हजर असणे गरजेचे असते. मात्र खेळ संपल्यानंतर विद्यार्थिनींना खासगी आॅटोमध्ये बसवून त्यांची ने-आण सर्रास केली जात आहे. गुरूवारी सकाळी खेळ संपल्यानंतर विद्यार्थिनी इंदाराम येथे आॅटोने परतत असताना लोकमत प्रतिनिधीने याबाबत त्यांची विचारपूस केली असता, शिक्षिका आमच्यासोबत नाहीत. त्या अहेरीतच आहेत, असे सांगितले. इंदाराम मार्ग अत्यंत दुरवस्थेत असून या मार्गावर नेहमीच अपघात घडत असतात. शिवाय आॅटोमध्ये केवळ विद्यार्थिनीच असल्याने अन्य दुर्घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यातच अहेरी-इंदाराम मार्गावर नियमित बससेवा आहे. गुरूवारी आॅटोच्यासमोरच बस सुटलेली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्ये विद्यार्थिनींना बसविणे गरजेचे होते. मात्र सुरक्षिततेचा प्रवास सोडून विद्यार्थिनींची आॅटोने ने-आण करण्यात आली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी प्रथम मुख्याध्यापिका व शिक्षिकांची असते. परंतु विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले. शारीरिक शिक्षिकेची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती देण्यात आली. परंतु तरीसुद्धा इतर शिक्षिकांवर विद्यार्थिनींना ने-आण करण्याची जबाबदारी देणे गरजेचे होते. (प्रतिनिधी) विद्यार्थिनींना खेळासाठी ने- आण करण्याची जबाबदारी शारीरिक शिक्षिकेची असते. मी कालच सुटीवरून परतली. त्यामुळे आज घडलेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधित शिक्षिकेकडून खुलासा मागविला जाईल. - डी. वाय. ढवस, मुख्याध्यापिका, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, इंदाराम