शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

उपजिल्हाधिकाऱ्यांकडून विहीर बांधकामाची पाहणी

By admin | Updated: June 7, 2015 02:05 IST

येथून जवळच असलेल्या शंकरनगर व पळसगावाला रोहयो उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर यांनी भेट देऊन या दोन गावांमधील विहीर, रस्ता बांधकाम व इतर कामांची पाहणी केली.

कामाबाबत मार्गदर्शन : शंकरनगर व पळसगावला भेटजोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या शंकरनगर व पळसगावाला रोहयो उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर यांनी भेट देऊन या दोन गावांमधील विहीर, रस्ता बांधकाम व इतर कामांची पाहणी केली. शंकरनगर येथे रोहयो अंतर्गत चार सिमेंट रस्ते, विहीर बांधकाम, पांदन रस्ते, रोपवन, मजगीचे काम करण्यात आली आहेत. या सर्व कामांना पिंपळगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान अकुशल कामापेक्षा कुशल कामाची टक्केवारी जास्त असल्याचे निदर्शनास आले. अकुशल कामावर केवळ २२ मजूर काम करीत असल्याची माहिती ग्रामरोजगार सेवकाने दिली. पळसगाव ग्रामपंचायत अंतर्गत पाथरगोटा येथील मजगीचे काम, शेततळे व विहीर बांधकामाला प्रत्यक्ष भेट दिली. नवीन कामासोबतच जुन्या प्रलंबित कामांना जास्त महत्त्व देऊन ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत नरेगाचे संवर्ग विकास अधिकारी एस. पी. पडघम, तहसीलदार मनोहर वलथरे, संवर्ग विकास अधिकारी निमजे, शंकरनगरचे सरपंच सुजीत मिस्त्री, अशोक चक्रवती, जनबंधू, सुरेश शेबे, भूपती ढाली, राजू मंडल, सुबोध सरदार, तलाठी टिचकुले, पळसगावचे सरपंच मडावी, उपसरपंच बंडू दोनाडकर, सचिव उद्ध्व प्रधान, ग्राम रोजगार सेवक गणेश मातेरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांनी सांगितल्या विहीर बांधकामातील अडचणीसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शंकरनगर येथील अनेक शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यात विहिरींचे बांधकाम सुरू आहे. मात्र बऱ्याचवेळा प्रशासनाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे अनेक विहिरींचे बांधकाम रखडले आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून विहिरींचा निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली.