शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

साडेचार लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Updated: June 10, 2024 18:51 IST

माओवादी बॅनर व पत्रके लावण्याचा तसेच जंगलात स्फोटके पुरुन ठेवल्याचे दोन गुन्हेही त्याच्या नावावर आहेत.

गडचिरोली : साडेचार लाखांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके (रा. नेलगुंडा ता. भामरागड) याने १० जून रोजी पोलिस व केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे माओवादी चळवळीला आणखी एक धक्का बसला आहे. २०१४ मध्ये किशोर कन्नाके हा जनमिलिशिया सदस्य म्हणून भामरागड दलममध्ये भरती होऊन २०१५ पर्यंत कार्यरत होता. २०१५ मध्ये डीएकेएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना) मध्ये अध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत राहिला. २०१८ मध्ये आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) सदस्य म्हणून त्याने कामाला सुरुवात केली व २०२२ पर्यंत जबाबदारी सांभाळली. २०२२ पासून तो भामरागड दलम सदस्य व आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) च्या अध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे तीन गुन्हे नोंद आहेत. २०१७ मध्ये दरबा पहाडी जंगल परिसर, २०२१ मध्ये कोपर्शी जंगल व २०२२ मध्ये पेनगुंडा जंगलातील दंगलीत त्याचा सहभाग होता.  जाळपोळीचे चार गुन्हे त्याच्या नावावर आहेत. माओवादी बॅनर व पत्रके लावण्याचा तसेच जंगलात स्फोटके पुरुन ठेवल्याचे दोन गुन्हेही त्याच्या नावावर आहेत. चार खुनांचा आरोपजहाल माओवादी किशोर कन्नाकेवर चार खुनांचा आरोप आहे. २०१५ मध्ये मल्लमपड्डूर तलावाजवळील रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.२०१८ मध्ये मध्ये मौजा गोंगवाडा टी-पॉइंट जवळ निरपराध व्यक्तीच्या खुनाचाही त्याच्यावर आरोप होता. २०१९ मध्ये मौजा जूवी नाल्याजवळ झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.२०२३ मध्ये मौजा पेनगुंडा ते गोंगवाडाकडे  रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तो सामील होता.  अडीच वर्षांत १५ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पणसन २०२२ ते आतापर्यंत १५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्यासाठी नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक जगदीश मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल हे प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली