शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

उपकमांडरसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; वर्षभरात ३४ जणांनी सोडली नक्षलींची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 19:05 IST

नववर्षाच्या पूर्वसंध्येला (दि.३१) गडचिरोली पोलिसांना नक्षलविरोधी अभियानात पुन्हा एक यश मिळाले.

गडचिरोली : नववर्षाच्या पूर्वसंध्येला (दि.३१) गडचिरोली पोलिसांना नक्षलविरोधी अभियानात पुन्हा एक यश मिळाले. एक प्लाटून उपकमांडर व तीन महिलांसह एकूण पाच जणांनी शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत नक्षल चळवळीचा त्याग केला. त्या सर्वांवर मिळून २७ लाख रुपयांचे बक्षीस होते.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्या पाचही जणांना पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ  देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग आणि मनिष कलवानिया प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माहिती देताना पो. अधीक्षक बलकवडे म्हणाले, पोलिसांनी जिल्हाभरात आदिवासी बांधवांकरिता जनजागरण मेळावे, शांती मेळावे, ग्रामभेटी तसेच नवजीवन योजनेंतर्गत गावोगावी भेटी दिल्या. त्यात जे तरुण-तरुणी नक्षल दलममध्ये भरती झाले आहेत त्यांच्या घरी जाऊन नक्षल चळवळीमुळे त्यांचे कसे नुकसान होत आहे आणि पोलीस दल त्यांच्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करू शकते हे पटवून दिले. त्यामुळे या वर्षभरात ३४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात २ डीकेएसझेडसी मेंबर, १ दलम कमांडर, ४ सदस्य, २ पार्टी मेंबर आणि १३ समर्थकांचा समावेश आहे. त्या सर्वांवर १ कोटी ८० लाख रुपयांचे बक्षीस होते, असे त्यांनी सांगितले.आत्मसमर्पण करणा-यांची कारकीर्द१) अजय उर्फ मनेसिंग फागुराम कुळयामी - हा एप्रिल २००७ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला होता. जुलै २०१६ पासून प्लाटून क्रमांक ३ मध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १९ गुन्हे, खुनाचे १२, जाळपोळीचे ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ५.५० लाखांचे बक्षीस होते.२) राजो उर्फ गंगा उर्फ शशिकला सोमजी तुलावी- ही २००८ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली. जुलै २०१५ पासून प्लाटून क्रमांक ३ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ८ गुन्हे, खुनाचे २ तर जाळपोळीचे २ गुन्हे आहेत. तिच्यावर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.३) सपना उर्फ रुखमा दोनू वड्डे- ऑक्टोबर २००६ मध्ये चातगाव दलममध्ये भरती झाली. २०१२ पासून ती प्लाटून क्रमांक १५ मध्ये सदस्य होती. तिच्यावर चकमकीचे १२, खुनाचे ४ तर जाळपोळीचे ४ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते.४) गुन्नी उर्फ बेहरी उर्फ वसंती मनकेर मडावी- डिसेंबर २००७ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली. २०१३ मध्ये टिपागड दलमच्या पीपीसीएम या पदावर तिची पदोन्नती झाली. नंतर २०१५ पासून कंपनी क्र.१० च्या सदस्यपदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे २ गुन्हे असून ५ लाख ७५ हजार रुपयांचे बक्षीस होते.५) सुनील उर्फ फुलसिंग सुजान होळी- जुलै २००८ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. फेब्रुवारी २०१३ पासून कंपनी क्र.१० मध्ये सदस्यपदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १२ गुन्हे, खुनाचे ४, जाळपोळीचे ३ तर  अपहरणाचे २ गुन्हे आहेत. त्याच्यावर ५ लाख ७५ हजारांचे बक्षीस होते.