शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्लाटून कमांडर सैनू व रूपीसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 10:28 IST

गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

ठळक मुद्देदोन महिलांचा समावेशसर्वांवर होते २४ लाखांचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.सैनू ऊर्फ मिरगू झुरू वेळदा (३५) हा एप्रिल २००१ मध्ये कसनसूर एरिया प्लाटून क्रमांक ३ मध्ये भरती झाला. २००८ मध्ये कंपनी क्रमांक ४ च्या प्लाटून ‘ए’ कमांडर म्हणून त्याची पदोन्नती झाली. त्याचा एकूण ६३ पोलीस-नक्षल चकमकीमध्ये सहभाग होता. त्याचबरोबर त्याच्यावर ११ ब्लास्टिंग, १७ खून, ४ जाळपोळ, ३ अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर १२ लाख रूपयांचे बक्षीस होते.रूपी ऊर्फ झुरी कांडे नरोटे (३६) ही डिसेंबर २००३ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. २००८ पासून ती प्लाटून क्रमांक ४ ‘सी’ मध्ये कमांडर म्हणून कार्यरत होती. तिच्यावर ४२ पोलीस-नक्षल चकमक, ७ ब्लास्टिंग, ८ खून व २ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर ६ लाख रूपयांचे बक्षीस होते. अर्जुन नरेश बारसाय पोया (२५) हा सप्टेंबर २०११ ला टिपागड दलममध्ये सदस्यपदावर कार्यरत होता. मार्च २०१४ पासून त्याची प्रेसटीम सदस्य म्हणून नेमणूक झाली. त्याचा ५ पोलीस-नक्षल चकमक, १ खून व ५ जाळपोळीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.छाया ऊर्फ राजे देवू कुळयेटी (२३) ही आॅगस्ट २०११ ला भामरागड दलममध्ये भरती झाली. मार्च २०१५ पासून साऊथ डिव्हिजन सीएनएम टीममध्ये सदस्यपदावर ती कार्यरत होती. तिच्यावर ५ पोलीस-नक्षल चकमक, ३ खून व ८ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.विणू ऊर्फ रामनाथ ऊर्फ बिजावू सुंदर कोवाची (२२) हा जून २०११ ला टिपागड एलओएस सदस्यपदावर भरती झाला. डिसेंबर २०१६ पासून डीव्हीसी जोगन्ना याचा गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचा ६ पोलीस-नक्षल चकमक, २ खून व ७ जाळपोळीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांमध्ये सैनू वेळदा व रूपी नरोटे तसेच अर्जुन पोया व छाया कुळयेटी हे पत्नी-पत्नी आहेत. २०१७-१८ या वर्षात आतापर्यंत एकूण २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.प्रभारी पोलीस अधीक्षक राजा आर, अपर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडित यांच्यासमोर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी