शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

गडचिरोलीतील सुरजागड बनणार देशातील पहिली प्रदूषणरहित 'ग्रीन माइन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:35 IST

Gadchiroli : ३ लाखांहून अधिक रोपांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली येथील सुरजागड लोहउत्खनन प्रकल्प देशातील पहिला ग्रीन माइन बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. खाणकामांमध्ये प्रत्येक टप्प्यांवर कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी प्रदूषणरहित यंत्रसामग्रीचा वापर केला जात असल्याची माहिती पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला लॉयडस् मेटल्स् अॅड एनर्जी लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी दिली.

यापूर्वी सूरजागड लोहखनिज खाणीने कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात दरवर्षी ३२ हजार टन इतकी लक्षणीय घट केली आहे. अक्षय ऊर्जा स्रोतांआधारे ही बचत दरवर्षी सुमारे ५० हजार टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. हरित वाहनांचा (भारत इलेक्ट्रिक वाहने) ताफा ३४ वरून ५६ इतका वाढला आहे, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि हरितगृह वायू उत्सर्जन आणि इंधन आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होते. २०२५-२६ मध्ये, एलएमईएल १०० हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा असणारी भारतातील पहिली खाण आहे. विद्युत-चालित कंप्रेसरचा अवलंब करून डिझेल-मुक्त ड्रिलिंग विकसित केले आहे, ज्यामुळे हाय-स्पीड डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

पहिली स्लरी पाइपलाइनखाणकामांतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासोबतच 'ग्रीन लॉजिस्टिक्स' वर लक्ष केंद्रित करत आहे. हेडरी येथील ग्राइंडिंग प्लांटपासून कोनसरी येथील पेलेट प्लांटपर्यंत ८७ किमी लांबीची स्लरी पाइपलाइन सुरू करून लोहखनिज वाहतुकीतील कार्बन फूटप्रिंट कमी केला आहे.या पाइपलाइनमुळे मालवाहतुकीचा खर्च प्रति टन ५००-६०० रुपयांनी कमी होईल, असा अंदाज आहे. स्लरी पाइपलाइनद्वारे रस्त्याने होणाऱ्या वाहतुकीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन वार्षिक ६१,००० टन (५५%) कमी करता येते.

३ लाखांहून अधिक रोपांची लागवडकंपनीने विविध ठिकाणी ३ लाखांहून अधिक झाडे लावली आहेत. सूरजागड लोहखनिज खाणीसाठी वळवण्यात आलेल्या ३७४.९० हेक्टर वन जमिनीच्या मोबदल्यात वनमंजुरीच्या अटींनुसार वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि कारंजा तालुक्यांमध्ये ३७७.५८ हेक्टर खासगी जमीन पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करून दिली, पूरक वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) मध्ये २.४९ कोटी रुपये जमा केले. आर्वी तालुक्यात पर्यायी वनीकरण क्षेत्रात राज्य वन विभागाद्वारे २,५६,३८८ रोपे लावण्यात आली. सरजागड येथे खाण सुरक्षा क्षेत्रातही हजारो रोपांची लागवड केली आहे.

हेडरी, मंगेर येथील तलावांचे पुनरुज्जीवनहेडरी आणि मंगेर येथील जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. तसेच निवासी संकुलांमध्ये सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांमध्ये प्रक्रिया केलेल्या ८५% पाण्यापैकी बहुतेक पाण्याचा पुनर्वापर होत आहे. या जलाशयांचे सुशोभीकरण केले आहे. फळे आणि औषधी झाडे देखील लावली आहेत. भूजल पुनर्भरण सुलभकरण्यासाठी जलसाठ्चांमध्ये दोन पुनर्भरण विहिरी बांधण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली