भामरागड : लोकबिरादरी रूग्णालय हेमलकसा, विराज हेल्थ फाऊंडेशन सिंगापूर, अप्पलवार आय हॉस्पिटल गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हेमलकसा येथे नेत्र शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात ३१ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, नेत्र सहायक जगदिश यांच्यासह अप्पलवार आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. अद्वय हेमंत अप्पलवार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. अद्वय अप्पलवार यांनी नेत्राचे आजार व त्यावरील उपाय यावरही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात फोरस इंडिया लिमिटेडतर्फे दृष्टीपटलातील दोष निदानाकरिता उपयुक्त असलेले फॅड्स कॅमेरा लोकबिरादरी रूग्णालयात बसविण्यात आला. याचे प्रात्यक्षिक डॉ. अप्पलवार यांनी करून दाखविले. यावेळी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे उपस्थित होते.
हेमलकसात ३१ रूग्णांवर शस्त्रक्रिया
By admin | Updated: February 10, 2017 02:11 IST