शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

सुरजागड ते कोनसरी उद्योग कॉरिडोर तयार होणार

By admin | Updated: March 7, 2017 00:45 IST

सुरजागड पहाडीवर राज्य सरकारने अनेक खासगी कंपन्यांना लोहखनिज उत्खननासाठी लिज दिली आहे. या ठिकाणी काही कंपन्यांनी काम सुरू केले आहे.

एमआयडीसी घेणार जागा : उद्योग विभागाच्या सचिवासोबत बैठकगडचिरोली : सुरजागड पहाडीवर राज्य सरकारने अनेक खासगी कंपन्यांना लोहखनिज उत्खननासाठी लिज दिली आहे. या ठिकाणी काही कंपन्यांनी काम सुरू केले आहे. या कामावर लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी लवकरच एटापल्ली तालुक्यातील युवकांना तांत्रिक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था केली जाणार असून सुरजागड ते कोनसरी यादरम्यान औद्योगिक कॉरीडोर तयार करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभाग व गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्याकडे उद्योगासाठी जागा कंपनीकडून मागण्यात आली होती. कंपनीने कोनसरी परिसरात जागेला पसंती दर्शविली होती. त्यानंतर उद्योग विभागाचे प्रधानसचिव अपूर्वचंद्र यांच्या समावेत कंपनीच्या अधिकाऱ्यांची १७ फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही जागा अधिग्रहण करण्याबाबत कारवाई करेल व नंतर या जागेचा मोबदला घेऊन कंपनीला जागा उद्योगासाठी उपलब्ध करून देईल. या बाबींवर चर्चा झाली व या संदर्भात लवकरच जिल्हा प्रशासनालाही सूचना केल्या जातील, असे ठरविण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील स्थानिकांनी एटापल्ली तालुक्यातच उद्योग उभारला गेला पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सुरजागड ते कोनसरी यादरम्यान औद्योगिक कॉरीडोअर तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. यात उद्योग समुहाच्या वतीने एटापल्ली परिसरात कामगार वसाहत, शाळा, दवाखाना आदीसह ट्रान्सपोर्टींग हब व या उद्योगाशी संबंधित विविध छोटे उद्योगधंदे विकसीत करण्यावर भर दिला जाणार आहे. कंपनीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्यातील युवकांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण विनामुल्य देऊनही रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतही तयारी कंपनीने शासनाकडे दर्शविली असल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)