शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निलगाय व माकडाच्या हल्ल्यात जखमी झाल्यास अर्थसहाय्य; शासनाची नव्याने तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 19:18 IST

गडचिरोली : वन्यजीवांनी हल्ला केल्यास वन विभागामार्फत जखमी व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये आता रोही (निलगाय) व माकड (वानर) ...

गडचिरोली : वन्यजीवांनी हल्ला केल्यास वन विभागामार्फत जखमी व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये आता रोही (निलगाय) व माकड (वानर) यांचा समावेश करण्यात आला असून या दोन वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमींना अर्थसहाय्य देण्याची तरतूद शासनाने केली आहे.

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे या वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत पावल्यास आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आधीच होती. या वन्यजीवांसोबतच निलगाय व माकडाच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटनाही घडत आहेत. 

शासन निर्णयात तरतूद नसल्याने माकड किंवा निलगायीने हल्ला करून जखमी केले तरी मदत मिळत नव्हती. या जखमींनाही मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे.त्यानुसार व्यक्ती मृत झाल्यास १५ लाख रुपये, गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये यापैकी कमी असणारी किंमत दिली जाईल. तसेच जखमी असलेल्या व्यक्तीलाही आवश्यक ती मदत दिली जाणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGadchiroliगडचिरोली