गडचिरोली : लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६, प्रशासकीय सेवा (विभागीय) पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, रामकिरीत यादव आदींनी पोलीस मुख्यालयात जाऊन संदीप पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पाटील यांनी गेल्या दोन वर्षाच्या काळात पोलीस विभागाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविल्यामुळे जिल्ह्यात एक चांगले वातावरण निर्माण झाले. या बाबीची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने त्यांच्या कार्यावर मोहोर उमटविली, अशी भावना नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव यांनी यावेळी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षकांचा नगराध्यक्षांकडून सत्कार
By admin | Updated: April 10, 2016 01:40 IST