शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

गडचिरोलीत पारंपरिक शेतीला फाटा देत पिकवले सुर्यफूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:26 IST

कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील ११ शेतकऱ्यांनी शेतकरी पुरूष बचत गटाची स्थापना करून ११ एकरात सुर्यफुलाची लागवड केली.

ठळक मुद्देनवरगावच्या शेतकऱ्यांचा प्रयोग‘आत्मा’च्या प्रशिक्षणातून नगदी पिकांकडे वळताहेत शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. पण अलिकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाच्या (आत्मा) मार्गदर्शनातून काही शेतकऱ्यांना हिंमत मिळाली आणि त्यांच्या शेतात आता सुर्यफुलाचे पीक डोलू लागले आहे.कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील ११ शेतकऱ्यांनी शेतकरी पुरूष बचत गटाची स्थापना करून ११ एकरात सुर्यफुलाची लागवड केली. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी त्या शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे वळण्याचा सल्ला देत कोणकोणती पिके ते घेऊ शकतात यासंदर्भात मार्गदर्शन केले. नगदी पिकांमुळे कमी-जास्त पाऊस किंवा कीडीच्या प्रादुर्भावामुळे घटणारे पिकांचे उत्पादन, महागडे बियाणे, कीटकनाशकासाठी वारंवार करावा लागणारा खर्च हे काही प्रमाणात नियंत्रणात येईल, ही बाब शेतकऱ्यांच्या गळी उतरविली. त्यामुळे शेतकरीही वेगळा प्रयोग करण्यासाठी तयार झाले. यातून जानेवारी २०१८ मध्ये सुर्यफुलाची लागवड केली आणि आता हे पीक चांगलेच बहरले आहे.शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष उदाराम कवाडकर यांनी सांगितले की, सुर्यफुलाच्या लागवडीसाठी एकरी ७ हजार रुपयांचा खर्च आला. एकूण जवळपास ८० हजारांचा खर्च आला. त्यातून १०० क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मधमाशीपालनही सोबतच सुरूसूर्यफुलाच्या शेतीसोबतच मधमाशी पालन व्यवसायाचे तंत्रही शेतकऱ्यांना दिले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडणार आहे. कमी लागवड खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या या पिकातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :agricultureशेती