शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

रविवारी जड वाहने सेमाना मार्गे केली वळती

By admin | Updated: May 16, 2016 01:30 IST

मूल मार्गावर भरणारा आठवडी बाजार व त्यानिमित्त मुख्य मार्गावर उसळणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलिसांनी शहरात येणारी जड वाहने

वाहतूक पोलिसांकडून अंमलबजावणी : इंदिरा गांधी चौक व कोर्टाजवळच्या चौकात उभे केले कठडेगडचिरोली : मूल मार्गावर भरणारा आठवडी बाजार व त्यानिमित्त मुख्य मार्गावर उसळणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलिसांनी शहरात येणारी जड वाहने (एसटी वगळून) सेमाना बायपास मार्गे वळते करण्यास सुरूवात केली आहे. हा नियम केवळ रविवारपुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे. गडचिरोली शहरात मूल मार्गावर आठवडी बाजार भरते. गडचिरोली तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील हजारो नागरिक आठवडी बाजाराला येतात. आठवडी बाजारालगत वाहन ठेवण्यासाठी कुठेच जागा नाही. त्यामुळे मुख्य मार्गाच्या बाजुला वाहने उभी केली जातात. वाहनांची ३०० मीटर अंतरावर वाहनांची रांग लागते. त्यातच रस्त्याच्या बाजूला बसलेले फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते व पादचारी यामुळे सदर मार्ग गर्दीने दिवसभर फुल्ल राहते. याच मार्गावरून चंद्रपूर, धानोरा मार्गे जड वाहनेही ये-जा करतात. त्यामुळे बाजाराच्या दिवशी वाहतूक खोळंबत होती. ही बाब वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर बाजाराकडे येणारी जड वाहने सेमाना बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दर रविवारी इंदिरा गांधी चौक व न्यायालयाजवळील चौकात तात्पुरते खांब उभे केले जात आहेत व या दोन ठिकाणी प्रत्येकी दोन वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जात आहे. चंद्रपूर मार्गे आलेले जड वाहने वाहतूक पोलीस सेमाना मार्गे वळती करतात. तसेच इंदिरा गांधी चौकातूनही जड वाहने सेमाना मार्गेच वळती केली जात आहे. वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाचे गडचिरोलीवासीयांनी स्वागत केले आहे. (नगर प्रतिनिधी)