शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

स्वरांना साथ देणाऱ्या सुलतानाचे आयुष्य बेसूर

By admin | Updated: October 23, 2016 01:36 IST

अंध असला तरी हार्मोनियम व तबला वादनात तरबेज असल्याने गायकाच्या स्वरांना साथ देण्याची कसब असलेल्या कढोली

शासकीय योजनांपासून वंचित : कढोली येथील तबला वादकाची कहानी प्रदीप बोडणे वैरागडअंध असला तरी हार्मोनियम व तबला वादनात तरबेज असल्याने गायकाच्या स्वरांना साथ देण्याची कसब असलेल्या कढोली येथील सुलतानाचे आयुष्य स्वत:च्या व कुटुंबातील सदस्यांच्या अपंगत्वामुळे बेसूर झाले आहे. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे वास्तव्यास असलेल्या सुलतान अजीज खॉ पठाण याची व त्याच्या कुटुंबाची कहानी डोळ्यात पाण्यात आणणारी आहे. सुलतान हा जन्मताच दृष्टीहीन आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही मोलमजुरी करून पोटाची खडगी भरण्याबरोबरच त्याने तबला व हार्मोनियम वादनाचे धडे घेतले. हळूहळू अपंग असलेल्या सुलतानला हार्मोनियम व तबला वादनाचा छंद जडला. सुलतान हा तबला तसेच हार्मोनियम वादनात अतिशय तरबेज आहे. दृष्टीने जरी अंधळा असला तरी परमेश्वराने त्याचे कान अतिशय संवेदनशील बनविले आहेत. गाण्याचा सूर कानावर पडताच सुलतानची बोटे तबल्यावर थबकायला लागतात. त्याच्या तबला वादणाने रसिक मंत्रमुग्ध होत असले तरी त्याच्या कुटुंबाची कहानी मात्र डोळ्यात अश्रू आणणारी आहे. सदैव अंधारवाटेने चालणाऱ्या सुलतानला पायापुरता प्रकाश देण्यासाठी कुरेशा बेगम ही सहचरणी झाली. या दोघांच्या संसार वेलीवर दोन फुले फुलली. मात्र या दोन्ही फुलांचा सुगंध कडवटच मानावा लागेल. मोठा मुलगा लतीफ हा मतिमंद आहे. तर लहान मुलगा अहमद पठाण हा बुद्धीने तेज असला तरी पायाने अपंग आहे. लतीफ हा आठव्या वर्गात शिकत आहे. तर अहमद हा नवव्या वर्गात शिकत आहे. म्हातारपणात आपली मुले काठी बनून समोर होतील, या आशेवर सुलतान जगत होता. मात्र ही आशा फोल ठरली. वयस्क सुलतानालाच संसाराचा भार उचलावा लागत आहे. लतीफ व अहमद हे दोघेही श्री तुकाराम विद्यालयात शिकत आहेत. अहमद हा शाळेच्या दारासमोर फावल्या वेळात चणे-फुटाणे विकून प्रपंचाला मदत करीत आहे. श्री तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक पुस्तोडे व त्यांचे सहकारी दोन्ही भावांच्या शिक्षणासाठी प्रयत्नरत आहेत. आजपर्यंत सुलतानाला केवळ घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे. तोे मदतीच्या प्रतीक्षेत आहे. स्वयंसेवी संस्थांचीही पाठधर्माने मुसलमान असला तरी सुलतान सर्वधर्म समभाव मानतो. त्यामुळे तो व त्याचे कुटुंब तुळशीचा कधी विटाळ मानत नाही. गुलालाची त्यांना बांधा नाही. स्वत:समोर तो धर्माचे कधी बिरूद लावत नाही. गरीबांना मदत केल्याचा आव आणणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्था आहेत. मात्र अजूनपर्यंत एकाही सामाजिक व स्वयंसेवी संस्थेने या सुलतानाच्या कुटुंबाला मदत केली नाही. सुलतान हा स्वत:ची लढाई स्वत:च लढत आहे. भविष्यात आपल्याला कुणी मदत करेल, या आशेवर तो जीवन जगत आहे.